वाचन संकृती जपण्यात ग्रंथालयाचा मोठा हातभार : बाविस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 07:48 PM2017-08-14T19:48:12+5:302017-08-14T19:53:31+5:30
बुलडाणा : आजच्या मोबाईल आणि संगणक युगातही वाचनाचे महत्व अबाधीत आहे. पुस्तकांची आणि वाचकांची गाठभेट घडविण्यासचे काम ग्रंथालय करतात. वाचन संस्कृतीचे जतन करण्यासह वाचनाची आवड वाढविण्याच्या कामात ग्रंथालयाचा मोठा हातभार आहे, असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बाविस्कर यांनी येथे बोलताना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात १२ आॅगस्ट रोजी ग्रंथप्रदर्शन व बुलडाणा आणि मोताळा तालुक्यातील ग्रंथपाल, ग्रंथालयीन कार्यकर्ते यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बाविस्कर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथालयांची जबाबदारी, वाचन संस्कृती, मोबाईल आणि संगणक युगातही वाचनाची आवड अबाधीत राहावी यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. योवळी कि.वा. वाघ यांनीही ग्रंथालय चळवळीची माहिती दिली. कार्यक्रमाला बुलडाणा व मोताळा तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.