हृदयद्रावक! स्वत:चे सरण रचून अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 08:31 PM2018-07-29T20:31:07+5:302018-07-29T20:31:47+5:30

स्वत:चे सरण रचून अल्पभूधारक शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

Life ended by a marginal farmer | हृदयद्रावक! स्वत:चे सरण रचून अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन 

हृदयद्रावक! स्वत:चे सरण रचून अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन 

Next

बुलडाणा  - स्वत:चे सरण रचून अल्पभूधारक शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील  सिंदखेड राजा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड तेजन येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
 
मृत शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन होती. तो पत्नी व मुलांसह राहत होता. दरम्यान, त्याच्यावर बँकेचे सुमारे 70 हजार रुपयांचे कर्ज होते. या शेतकऱ्याच्या सरणाजवळ कीटकनाशक आणि रॉकेलचा डबा आढळून आला आहे.   

Web Title: Life ended by a marginal farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.