पत्नी व मुलाचा खून करणाºयास जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:43 AM2018-04-27T01:43:16+5:302018-04-27T01:43:16+5:30
खामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीने वार करून पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा खून करणाºया आरोपी पतीस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. एम. पथाडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील नूरमोहम्मद शे. हबीब (वय २९) याने २३ एप्रिल २०१४ च्या रात्री पत्नी सादेकाबी (वय २६) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घातला व कुºहाडीने पत्नी सादेकाबी व मुलगा मुदसीर (वय २) या दोघांवर वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी मृतक सादेकाबीची आई नसीबाबी जरीतखान यांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी नूर मोहम्मद शेख हबीबविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तपास अधिकारी पीएसआय संजय सोनोने यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणी न्यायालयाने एकूण १४ साक्षीदार तपासले. यामध्ये पोलीस पाटील रवींद्र वानखडे आणि आरोपीची बहीण तौराबी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यामुळे न्यायाधीशांनी आरोपी नूर मोहम्मद यास दोषी ठरवून त्यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. वसंत भटकर यांनी काम पाहिले.