तिहेरी खुनासाठी आरोपीला जन्मठेप
By admin | Published: January 24, 2017 07:31 PM2017-01-24T19:31:20+5:302017-01-24T19:31:20+5:30
घरगुती वादावरून २३ मार्च २०१५ रोजी पत्नी, सासू व आठ वर्षीय मुलीची हत्या करणाºया संतोष भाडाईत याला
Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 24 - घरगुती वादावरून २३ मार्च २०१५ रोजी पत्नी, सासू व आठ वर्षीय मुलीची हत्या करणाºया संतोष भाडाईत याला बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच हजार रूपये दंडही ठोठावला. इसोली येथील आरोपी संतोष प्रल्हाद भाडाईत याला दारू पिण्याची सवय होती. तो पत्नी गीताला मारहाण करीत होता. त्यामुळे गिता माहेरी सवणा येथे आई
विमल व मुलगी आरती यांच्यासमवेत राहत होती. घटनेच्या दोन महिने पूर्वीपासून संतोष सवणा येथे राहण्यास आला होता. २३ मार्च २०१५ ला रात्री ८.०० वाजता संतोषने पत्नी व सासूसोबत भांडण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मध्यरात्रीला पत्नी व सासू विमलबाई यांच्या डोक्यावर फावड्याने मारहाण करून त्यांना ठार केले. त्याचवेळी मुलगी आरती झोपेतून उठून जोरजोराने रडायला लागली म्हणून आरोपीने तिच्याही डोक्यात फावड्याने वार करून तिला ठार केले व घराला बाहेरून कडी लावून पळून गेला.
याप्रकरणी गिताचा भाऊ गजानन मोतीराम गाढवे यांनी चिखली पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संतोषविरूध्द भादंवीचे कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांनी केला व तपास पुर्ण झाल्यानंतर प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र विष्ट यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात
आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदारांचे साक्षी-पुरावे नोंदविण्यात आले. मयताचे भाऊ, शेजारी, डॉक्टर व तपास अधिकारी या सर्वांची साक्ष विचारात घेवून विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश विष्ट यांनी यांनी २३ जानेवारी १७ रोजी आरोपी संतोष यास जन्मठेप व १००० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना कारावास अशा प्रकारची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड.सोनाली सावजी देशपांडे सरकारी वकील बुलडाणा यांनी काम पाहिले. तसेच साक्षीदार, तपास अधिकारी व डॉक्टर यांची साक्ष जिल्हा सरकारी वकील अॅड.अमोल बल्लाळ यांनी नोंदविली. (प्रतिनिधी)