शेगाव रेल्वे स्थानकावर बसणार लिफ्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:46 PM2018-07-17T13:46:11+5:302018-07-17T13:49:47+5:30
शेगाव - येथील रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ मंडळ रेल प्रबंधक आर के यादव यांनी दिली.
- अनिल उंबरकार
शेगाव - येथील रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ मंडळ रेल प्रबंधक आर के यादव यांनी दिली.
ही शेगावकर जनतेसह प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता आहे.तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येणा?्या शेगावसह मलकापूर, नांदुरा , जलंब ,नागझरी या रेल्वे स्थानकावर सुध्दा प्रवाशांचे सोयीचे दृष्टीने विविध कामे करण्यात आली आहेत.तसेच अनेक कामे प्रगतीवर तर अनेक कामे प्रस्तावित असल्याची माहिती मंडळ रेल्वे प्रबंधक आर के यादव यांनी खा. प्रतापराव जाधव यांना पत्रान्वये दिली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेगाव सह सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत व आतापर्यंत च्या मंजूर कामांचा आढावा खा. प्रतापराव जाधव यांनी मागितला होता.
शेगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ची उंची वाढविण्यात आली आहे. तसेच शेगावसह जलंब - नांदुरा येथे कवर ओवर शेड ,पादचारी पूल, स्टेशनच्या इमारती व सांडपाण्याचे नाली बांधकाम झाले.
2018-19 वर्षात शेगाव अपलूप लाईनवर अतिरिक्त होम लॅड प्लॅटफॉर्म चे पहिल्या टप्प्यातील काम व प्रस्तावित होम प्लॅटफॉर्म च्या परिसरात सुधारणा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
2018-19 वषार्साठी शेगाव , नांदुरा, नागझरी येथे नवीन पादचारी पूलाचे कामास मंजुरी देण्यात आली आहे. नांदुरा ,जलंब व मलकापूर येथील प्प्लॅटफॉर्म मध्ये सुधारणा करण्याचे कामास मंजुरी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे 2018-19 वर्षात शेगाव रेल्वे स्थानकावर दोन लिफ्ट बसविण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळ रेल्वे प्रबंधक आर के यादव यांनी खा. जाधव यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.( शहर प्रतिनिधी)
खा. प्रतापराव जाधव हे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालय व प्रशासनाच्या संपर्कात राहून पाठपुरावा करत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघील रेल्वे स्थानकाचा विकास होत आहे.
-दिनेश शिंदे, सदस्य,
विभागीय रेल्वे कमिटी भुसावळ.