लॉकडाऊनमध्येही दारू विक्री जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:20+5:302021-04-18T04:34:20+5:30

दुसरबीड आणि परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासनाच्या नियमावलीप्रमाणे संपूर्ण दुकाने त्याचप्रमाणे देशी दारूची दुकाने शासनाने बंद केली ...

Liquor sales are booming even in lockdowns | लॉकडाऊनमध्येही दारू विक्री जोमात

लॉकडाऊनमध्येही दारू विक्री जोमात

googlenewsNext

दुसरबीड आणि परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासनाच्या नियमावलीप्रमाणे संपूर्ण दुकाने त्याचप्रमाणे देशी दारूची दुकाने शासनाने बंद केली आहेत. या बंदचा फायदा घेत दारू विक्रेते छुप्या पद्धतीने मनमानी दराने दारू विक्री करीत आहेत. ज्या बाटलीची मूळ किंमत ५० ते ६० रुपये आहे, तीच बाटली ३०० रुपये घेऊन विकली जात आहे. अनेकांनी कमाईचा धंदा म्हणून याकडे आपले लक्ष वळविले आहे. त्याच प्रमाणे देशी दारू दुकानदार सर्व नियम धाब्यावर बसवून या लाॅकडाऊनचा फायदा घेत छुप्या मार्गाने आपल्या दुकानांमधील दारूचे बॉक्स दामदुप्पट किमतीने विकतात. समोर दारू विक्री करणारे एजंट ग्राहकांना लुटतात. संबंधित दारू विक्री विभागाचे याकडेसुद्धा पूर्ण दुर्लक्ष दिसून येते.

भाजीवाल्यांना दंड, दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष का

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांवर दंड करण्यात येतो. मात्र दारू विक्री करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का होते, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

Web Title: Liquor sales are booming even in lockdowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.