खामगाव नगरपालिका निवडणुकीत रंगणार थेट सामने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:04 AM2021-08-29T11:04:03+5:302021-08-29T11:04:09+5:30

नगरपालिका क्षेत्रात वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार केला जात असून, खामगाव पालिकेतील सर्वच ३३ वॉर्डांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळताहेत.  

Live matches to be played in municipal elections! | खामगाव नगरपालिका निवडणुकीत रंगणार थेट सामने!

खामगाव नगरपालिका निवडणुकीत रंगणार थेट सामने!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : आगामी नगरपालिका निवडणुकीत एकसदस्यीय वॉर्ड पध्दतीने निवडणूक राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार राज्यातील सर्वच नगरपालिका क्षेत्रात वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार केला जात असून, खामगाव पालिकेतील सर्वच ३३ वॉर्डांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळताहेत.  
गेल्या सोमवारपासूनच खामगाव नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. कच्चा आराखडा तयार करताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे कटाक्षाने पालन करावे,  असेही या आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार नगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्याच वेळी सरळ आणि थेट लढतीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारही आतापासूनच कामाला लागले आहेत. गत निवडणुकीत १७ नगरसेवकांनी पुन्हा नशीब आजमाविले होते. यामध्ये थेट लढतीत एका नगराध्यक्षांना तर एका माजी नगराध्यक्षांचा निसटता पराभव झाला होता.
आराखड्यासाठी   समिती गठीत!
n आगामी निवडणुकीकरिता प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाची माहिती असलेला व वॉर्डरचनेशी संबंधित अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ व आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


थेट तुल्यबळ लढतीचे संकेत!

n एकसदस्यीय वॉर्ड पध्दतीनुसार  खामगाव नगरपालिकेत आगामी निवडणुकीत ३३ वॉर्डांत निवडणूक होईल. यात सर्वच वॉर्डांमध्ये थेट तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत आहेत. गत निवडणुकीत प्रभाग पध्दतीच्या निवडणुकीतही दोन-तीन प्रभागांचा अपवाद वगळता सरळ-सरळ लढतीच झाल्या होत्या. त्यामुळे इच्छुक उमेदवार  आतापासूनच कामाला लागणार आहेत.


पाच प्रभागात कमी फरकाने विजयश्री!
 २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेविका सीमा वानखडे अवघ्या ३२ मतांनी  तर जाकीया बानो शेख अनिस केवळ ४४ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्याच वेळी काँग्रेसचे गटनेते अमेयकुमार सानंदा ५३ मतांनी विजयी झाले. नगरसेवक भूषण शिंदे  ६९ मतांनी विजयी झाले होते. याशिवाय माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांचाही कमी मतांनी पराभव झाला होता.

Web Title: Live matches to be played in municipal elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.