बाधित काळविटाला मिळाले जीवदान
By admin | Published: July 20, 2014 01:28 AM2014-07-20T01:28:02+5:302014-07-20T02:02:40+5:30
लोणार तालुक्यातील हिरडव रोडवरील शेतविहिरीत काळविट पडल्याची घटना.
लोणार : हिरडव रोडवरील एका शेतातील विहिरीत १८ जुलैच्या मध्यरात्री काळविट पडल्याची घटना घडली. आज सकाळी १0 वाजताच्या सुमारास सदर प्रकार लक्षात आला असता वनकर्मचार्यांनी विहिरीतील बाधित काळविटाला जीवदान दिले.
सद्या परिसरात पेरणीयुक्त पाऊस झाल्याने शेतशिवार हिरवेगार झाले असून, हिरडव रोडवरील परिसरात हरणांचे कळप मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी हरणाच्या कळपातील एक काळविट हिरडव रोडवरील अशोक अंभोरे यांच्या शेतातील विहिरीत पडले. सदर प्रकार सकाळच्या दरम्यान अशोक अंभोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली.
वनपाल काकडे यांना घटनास्थळावर येण्यास विलंब लागल्याने तोपर्यंत विहिरीतून बाहेर येण्यासाठी काळविट धडपड करु लागले. बर्याच वेळानंतर वनविभागाचे कर्मचारी जाधव, शेख, कोकाटे घटनस्थळी आले व त्यांनी या काळविटास विहिरीतून सुखरुप बाहेर काढले.त्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडून दिले.