कर्जमाफी अर्जामध्ये शेतक-यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:55 PM2017-09-20T18:55:25+5:302017-09-20T20:05:36+5:30
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कजार्ची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकºयांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न भरल्यास असे अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शेतकºयांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट आॅप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतेलल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी लागणार आहे. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकाकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. सदर माहीती सादर न केल्यास व अर्जदाराचा अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहील्यास त्याला अर्जदार जबाबदार राहणार आहे.