दोन हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा

By admin | Published: April 2, 2016 12:51 AM2016-04-02T00:51:00+5:302016-04-02T00:51:00+5:30

बुलडाणा जिल्ह्यासाठी १३६५ कोटी पीक कर्जाचे नियोजन; २ लाख ७९ हजार ९९0 खातेदार शेतक-यांना होणार लाभ.

Loan plan worth Rs. 755 crores | दोन हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा

दोन हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा

Next

बुलडाणा: जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, कुठल्याही प्रकारची कमतरता पीककर्जामध्ये येऊ नये, याकरिता शासनाने भरभक्कम १00 कोटी रूपयांची वाढ करीत जिल्ह्याला १३६५ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचा समावेश असलेला आराखडा मंजूर केला आहे. सन २0१६-१७ करिता एकूण सर्व बाबींचा २ हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये पीककर्ज, मुदती कृषीकर्ज, कृषीविरहित कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज आणि अन्य प्राधान्यक्रम क्षेत्रांतील कर्जाचा समावेश आहे. या एकूण कर्ज आराखड्यामध्ये कृषिकर्जाचा ६६ टक्के वाटा असून, मुदती कृषिकजार्साठी १३ टक्के हिस्सा आहे. गतवर्षी एकूण कर्ज आराखड्यामध्ये १२६५ कोटी रुपये कृषिकजार्साठी होते. त्यामध्ये यावेळी १00 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
उद्दिष्टित पीककर्ज २ लाख ७९ हजार ९९0 खातेदार शेतकर्‍यांना देण्यात येणार असून, यासोबतच नवीन पीककर्ज खातेदार शेतकर्‍यांनाही देण्यात येईल. पीककर्जाचे जास्तीत जास्त वितरण होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती पीककर्ज उद्दिष्ट आढाव्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शेंडे, नाबार्डचे बोंदाडे, विविध बँकांचे अधिकारी, सहकार कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Loan plan worth Rs. 755 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.