स्थानीक कलावंतांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:26 PM2017-08-23T23:26:22+5:302017-08-23T23:26:49+5:30
बुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालयातर्फे आर.बी. नावाच्या कंपनीतर्फे शहरी भागात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सहभाग सुरु झाला आहे. अशा उपक्रमासाठी आतापर्यंत विविध जनजागृतीसाठी परिश्रम घेणार्या स्थानिक कलावंतांना डावलण्यात आले असून जिल्ह्यातील मानधन घेणार्या ५0 कलासंच तसेच त्यातील ८00 कलावंतांमधून जनजागृतीसाठी कोणीच कलावंत शासनाच्या लेखी पात्र नसावा, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालयातर्फे आर.बी. नावाच्या कंपनीतर्फे शहरी भागात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सहभाग सुरु झाला आहे. अशा उपक्रमासाठी आतापर्यंत विविध जनजागृतीसाठी परिश्रम घेणार्या स्थानिक कलावंतांना डावलण्यात आले असून जिल्ह्यातील मानधन घेणार्या ५0 कलासंच तसेच त्यातील ८00 कलावंतांमधून जनजागृतीसाठी कोणीच कलावंत शासनाच्या लेखी पात्र नसावा, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोककला जिवंत रहावी म्हणून कलेवर जगणार्या लोक कलावंतांना शासन मानधन देण्याचे काम करत आहे. त्यातच त्यांचेमार्फत शाहिरी इतर कार्यक्रमांद्वारे शासनाच्या योजनेची माहिती पुरविण्याचे काम केल्या जात आहे. अशा प्रकारे जनजागृती करणार्या विविध कार्यक्रमात सहभाग घेणार्या कलासंचाची संख्या जिल्ह्यात ५0 असून त्यातील लोककलांवतांनी संख्या ८00 पेक्षा जास्त आहे. मात्र बेटी बचाओ, स्वच्छता अभियाना, दारुबंदी या सह विविध कार्यक्रम राबविणार्या लोककलावंतांना स्वच्छता अभियानातील आर. बी. कंपनीचा सहभाग शासनाने सुरू केल्यामुळे धक्का बसला आहे. बरेच वर्षापासून शासनाची नियमित सेवा करणारे लोककलावंत आता निराश झाले आहे. २५ सप्टेंबर २0१७ पयर्ंत हागणदारीमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्याकरता संपुर्ण महानगरपालिका नजीकच्या काळात हागणदारी मुक्त होणे आवश्यक आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनेअंतर्गत नागरी महाराष्ट्र ऑक्टोबर २0१८ पयर्ंत स्वच्छ करण्याचेही उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याकरीता नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर.बी. या कंपनीला जिल्ह्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती, वर्तणुकीतील बदल करण्याकरीता सहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या उपक्रमात स्थानिक लोककलावंतांना डावलल्यामुळे रोष व्यक्त होत आहे.
याबाबत शाहीर डी.आर.इंगळे यांच्या नेतृत्वात लोककलावंतांनी जिल्ह्याधिकार्यांना निवेदन देवून स्थानिक कलावंतांना संधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दररोज १0 पथनाट्ये कसे सादर होणार?
या उपक्रमाबाबत जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या एका पत्रानुसार ही कंपनी २२ ऑगस्ट रोजी मलकापूर मोताळा, २३ ऑगस्ट रोजी नांदुरा खामगाव, २५ ऑगस्ट रोजी संग्रामपूर जळगाव जामोद, २६ ऑगस्ट रोजी मेहकर लोणार, २८ ऑगस्ट रोजी चिखली येथे दहा पथनाट्य सादर करणार आहेत. तर शेगाव येथे २४ ऑगस्ट रोजी सात पथनाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. तर एका दिवशी एवढे पथनाट्य सादर होऊ शकत नसल्याचे लोककलांवतांचे म्हणणे आहे.
सांस्कृतीक व जनजागृतीच्या क्षेत्रात ठेकेदारी पध्दत चुकीची असून जे कलावंत प्रत्यक्ष जनजागृती करतात. अशा कलावंतांना संधी द्यावी, अन्यथा जिल्ह्यातील कलावंत न्याय मिळण्यासाठी आंदोलन करतील.
- शाहीर डी.आर. इंगळे,
लोककवी वामन कर्डक प्रतिष्ठाण, बुलडाणा