पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:21+5:302021-02-24T04:35:21+5:30
कोट शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून व्यवसास सुरू रहावेत. वेळेची बंधने टाकण्यासोबतच शारीरिक अंतर पाळण्यासोबतच आनुषंगिक उपाययोजना करून ...
कोट
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून व्यवसास सुरू रहावेत. वेळेची बंधने टाकण्यासोबतच शारीरिक अंतर पाळण्यासोबतच आनुषंगिक उपाययोजना करून व्यवसाय सुरू रहावेत. मास्क वापरणाऱ्यांनाच दुकानात प्रवेश देण्यासाबेतच व्यावसायिकांनी दुकानात त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वीज बाफणा, अध्यक्ष, बुलडाणा चेंबर ऑफ कॉमर्स, बुलडाणा
कोट
व्यवसाय, उद्योग कुठलाही असो. कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून ते सुरू रहावेत. निर्जंतुकीकरण, शरीराचे तापमान मोजणे, सुरक्षित अंतर ठेवून उद्योग सुरू रहावेत. लॉकडाऊन परवडणारे नसले तरी सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यास प्राधान्य देऊन उद्योग सुरू असावे. कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करून उद्योग सुरू रहावेत.
राजेश महाजन, उद्योजक, मलकापूर
कोरोनाचे एकूण रुग्ण :- १६,९१२
बरे झालेले रुग्ण:- १४,८२२
एकूण मृत्यू:- १८७
कोरानाचा धोका वाढतोय
जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांत जवळपास दोन हजार कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देणे आवश्यक आहे. प्रशासकीय पातळीवर त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. वैयक्तिकस्तरावही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.