लोणार सरोवर संशोधनालाही लॉकडाउनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:43 AM2020-05-23T10:43:08+5:302020-05-23T10:43:19+5:30
नासाचे शास्त्रज्ञ, इंग्लंड, फ्रान्समधून नियमित अभ्यासासाठी येणाºया शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्येही यामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवर संशोधनालाही कोरोना संसर्गाच्या उद्रेकाचा फटका बसला असून भूगर्भ, रसायन शास्त्रासह स्प्रेक्टॉस्पोकी शास्त्राच्या अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांसह नासाचे शास्त्रज्ञ, इंग्लंड, फ्रान्समधून नियमित अभ्यासासाठी येणाºया शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्येही यामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे.
अ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून लोणार सरोवर ओळखल्या जाते. भूगर्भशास्त्रासह, खगोलिय अभ्यासासह जैविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व सर्वश्रृत आहे. त्यामुळे वर्षभर येथे पीएचडी करणारे विद्यार्थी, खडकांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ यांचा राबता असतो. प्रामुख्याने प्री मान्सून काळात या ठिकाणी शास्त्र येण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र नेमक्या याच काळात लॉकडाउनमुळे या संदर्भातील संशोधनाला बाधा पोहोचली आहे.
उल्कापातातून निर्माण झालेले खाºया पाण्याचे लोणार सरोवर जगविख्यात असून उल्कापात होताना तो अग्नेय दिशेकडून ही उल्का या ठिकाणी पडली होती. त्यामुळे लोणार सोरवराची खोलीही अग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे कमी कमी होत गेलेली असल्याचे मध्यंतरी करण्यात आलेल्या एका अभ्यास समोर आले होते. जैविविधतेच्या दृष्टीनेही लोणार सरोवराचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणुनही त्याचा उल्लेख केल्या जातो. पहाटे दरम्यान, लोणार सरोवरातील पक्षी वैभव आणि विविध प्रजाती याची समृद्धी स्पष्ट होते. त्यामुळे देशातील विविध विद्यापीठातून विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत असतात. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स मधूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी लोणार सरोवराची पाहणी व अभ्यासासाठी येथे येतात. या व्यतिरिक्त देशातील विविध आयआयटीच्या संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी लोणार सरोवर अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्यांच्याही सातत्यपूर्ण होणाºया येथील भेटींमध्ये खंड पडला आहे. मॉन्सूनपूर्व काळातही येथे देशातील शास्त्रज्ञ भेट देत असतात.
नासाच्या शास्त्रज्ञांचीही असते नियमित भेट
गेल्या वर्षी नासाचे भूगर्भशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे शॉन राईट यांनी मार्च महिन्यात लोणार सरोवरास भेट दिली होती. नासाचे काही अन्य शास्त्रज्ञही त्यांच्या सोबत येत असतात. यंदा मात्र लॉकडाउन व जागतिकस्तरावर कोरोना संसर्गाचा झालेला उद्रेक पाहता लोणार सरोवरास उन्हाळ््यात शास्त्रज्ञांना भेटी देऊन पाहणी करता आलेली नाही. दुसरीकडे इन्फ्रारेड किरणांच्या माध्यमातून सरोवरातील खडक व अन्य वस्तूंमध्ये कोणते घटक आहे, याचाही स्प्रेक्टॉस्कोपी शाखेच्या माध्यमातून येथे परदेशी शास्त्रज्ञ अभ्यास करण्यासाठी येतात. मात्र लॉकडाउनमुळे या स्वरुपाच्या अभ्यासाला चालना मिळण्यात येथे अडचण जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.