‘लॉकडाऊन’मुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:04 AM2020-06-26T11:04:55+5:302020-06-26T11:05:04+5:30

कोरोनाच्या संसगार्मुळे पालक इकडे-तिकडे अडकले असल्यामुळे त्यांना प्रवेशासाठी तीन संधी दिल्या आहे.

‘Lockdown’ will provide three opportunities for RTE access | ‘लॉकडाऊन’मुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी

‘लॉकडाऊन’मुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे शाळा उशीरा सुरू होत असून आरटीईच्या प्रवेशाचा आता मुहूर्त निघाला आहे. यंदा प्रवेशासाठी एकच संधी देण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या संसगार्मुळे पालक इकडे-तिकडे अडकले असल्यामुळे त्यांना प्रवेशासाठी तीन संधी दिल्या आहे.
चालू शैक्षणिक वषार्साठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सध्यास्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहे. अशा सुचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आहेत.
शाळेत आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिन विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले आहेत. या नावापुढे या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवायचे आहे, ती तारीख शाळेने टाकावी. त्याप्रमाणे पालकांना एसएमएस जातील. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेचे नियोजन करावे व कोणत्या तारखेला बोलावे हे शाळेने ठरवावे अश्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील २३१ नोंदणीकृत शाळांमध्ये २ हजार ७८५ जागा आरक्षीत असून ६ हजार ५१० आॅनलाईन अर्ज आले आहेत.


आॅनलाईन अभ्यासक्रम
पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, काही पालक मुळगावी किंवा अन्य काही स्थलांतर झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते पालक आले नाही तर त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, तसा एसएमएस पाठवावा. त्यांना दिलेल्या तारखेला ते उपस्थित न राहिल्यास तिसऱ्यांदा तारीख देण्यात यावी अशाप्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी. शाळेचे आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर अशा तात्पुरत्या प्रवेशित बालकांना लाभ देण्यात यावा. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा या बालकांना प्रवेश झाले असे समजून वर्गात बसण्याची मुभा द्यावी.


जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. तसे संदेशही त्यांच्या पालकांना दिल्या जात आहेत. त्यानंतर प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
- एजाज खान
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा

 

Web Title: ‘Lockdown’ will provide three opportunities for RTE access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.