Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; एक पदव्युत्तर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:32 PM2019-04-05T16:32:18+5:302019-04-05T16:32:40+5:30

बुलडाणा : लोकसभा निवडणूकीसाठी बुलडाणा मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का अत्यल्प असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंतही झालेले नाही.

 Lok Sabha Election 2019: 10 candidates undergraduate in Buldhana constituency; A postgraduate | Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; एक पदव्युत्तर 

Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; एक पदव्युत्तर 

Next

- सोहम घाडगे 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लोकसभा निवडणूकीसाठीबुलडाणा मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का अत्यल्प असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंतही झालेले नाही. तर केवळ एकच उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक आहे. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करतांना दिसून येतात. मात्र प्रत्यक्षात लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राजकिय पक्ष व अपक्ष उमदेवारांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अत्यल्प आहे.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 'लोकमत'ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. बुलडाणा मतदार संघात एकुण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी चार उमदेवार बारावी पास आहेत. तीन उमेदवार दहावी पास असून दहावीपेक्षा कमी शिकलेल्यांची संख्या तीन आहे. एक उमेदवार वैद्यकिय शाखेचे शिक्षण घेतलेले तर एक संगणक शाखेचे पदवीधर आहे. जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

सर्वाधिक संख्या बारावी पासची
एकूण १२ उमेदवार रिंगणात असून केवळ दोन उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेले आहे. इतरांचे शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बुलडाणा  जिल्ह्याचे उमेदवार शैक्षणिक दृष्ट्याही  मागास असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यात ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. 


साक्षरतेत जिल्हा राज्यात बाराव्या स्थानी
साक्षरतेच्या बाबतीत बुलडाणा जिल्हा राज्यात १२ व्या स्थानी आहे. जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ८३.४ आहे. शहरी साक्षरता ८९.०८ तर ग्रामिण साक्षरतेचे प्रमाण ८१.८५ इतके आहे. साक्षरतेचा विचार केल्यास राज्यात जिल्ह्याची स्थिती चांगली आहे. असे असतांना उच्चशिक्षितांना राजकारणात रस नसल्याचे दिसून येत आहे. राजकारणात उच्चशिक्षितांनी आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. मात्र लोकसभा निवडणूकीसाठी उच्चशिक्षितांचे प्रमाण अत्यल्प आहे.

Web Title:  Lok Sabha Election 2019: 10 candidates undergraduate in Buldhana constituency; A postgraduate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.