Lok Sabha Election 2019: दहा हजारावरील रक्कम द्यावी लागणार धनादेशाद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 03:08 PM2019-03-19T15:08:25+5:302019-03-19T15:08:30+5:30

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे

Lok Sabha Election 2019: Over Ten thousand rupees must be paid by cheque | Lok Sabha Election 2019: दहा हजारावरील रक्कम द्यावी लागणार धनादेशाद्वारे

Lok Sabha Election 2019: दहा हजारावरील रक्कम द्यावी लागणार धनादेशाद्वारे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना द्याव्या लागणार्या शपथपत्रामध्ये उमेदवारावरा विरोधातील प्रलंबीतखटले, सिद्धदोषी खटले असल्यास त्याची माहितीही द्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे दृकश्राव्य माध्यमासोबतच जादा खपाच्या मुद्रीत माध्यमातही त्याबाबतचे घोषणापत्र उमेदवाराला द्यावे लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिनांकापासून ते मतदानाच्या दिवशीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत ती देणे अनिवार्य राहणार आहे. दरम्याान, उमेदवार हा राजकीय पक्षाचा असल्यास त्याबाबतची प्रसिद्धी ही संबंधित पक्षाने विधीत वेळेत देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दुसरीकडे निवडणूक रिंगणातील उमेदवारास त्याने बँके उघडलेल्या स्वतंत्र खात्यातूनच निवडणुकीशी संबंधीत खर्च करणे अनिवार्य आहे. दहा हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहारच फक्त त्यांना रोखीने करता येणार असून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार हे धनादेशाद्वारे किंवा आरटीजीएस, ए़नईएफटी द्वारे करणे अनिवार्य असून दररोजच खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. सोबतच निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत खर्चाच्या अंतिम विवरणाची सत्यप्रतही जिल्हानिवडणूक अधिकार्यांकडे त्यांना सादर करावी लागणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Over Ten thousand rupees must be paid by cheque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.