लोणार : ग्राम पंचायतवर तरुणाईचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:26 AM2017-10-10T00:26:22+5:302017-10-10T00:26:44+5:30
लोणार: थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांवर मात करीत ग्रामपंचायतवर तरुणाईचा झेंडा फडकला असून, ‘प्रस्ता िपतांविरुद्ध युवकांची मोर्चेबांधणी’ दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांवर मात करीत ग्रामपंचायतवर तरुणाईचा झेंडा फडकला असून, ‘प्रस्ता िपतांविरुद्ध युवकांची मोर्चेबांधणी’ दिसून येत आहे.
खा. प्रतापराव जाधव यांनी युवकांना संधी देत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अनेकांना निवडणुकीच्या रिंगणात उ तरवले आणि युवकांनी तालुक्यात भगवा फडकविल्याने नव्या उमद्या युवकांची फळीच तालुक्यात तयार झाली आहे. तर केंद्र व राज्यात सत्ता असताना भाजपा तालुका अध्यक्ष अँड. शिवाजी सानप यांना त्यांच्या गंधारी गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता ग्रामपंचायतमध्येसुद्धा हार मानावी लागलेली आहे. तर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदानंद तेजनकर यांचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार शिवसेनेच्या शिवपाटील तेजनकर यांच्या उमेदवारांसमोर ढेर झाले आहे. विजयाचा जल्लोष करीत युवकांनी शहरातून मिरवणूक काढली. शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते शंकर डोळे यांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. विकासात्मक दृष्टिकोनातून म तदारांनी निवडून दिलेले सरपंच व सदस्य कासा विकास करणार, याकडे आता गावकर्यांचे लक्ष लागले आहे.