लोणारमध्ये वृद्धाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 13:50 IST2018-06-16T13:50:59+5:302018-06-16T13:50:59+5:30
लोणार : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार शहरालगत मंठा मार्गावर एका वृद्धाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.

लोणारमध्ये वृद्धाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला
लोणार : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार शहरालगत मंठा मार्गावर एका वृद्धाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, त्याच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबलेला असल्याने प्रथम दर्शनी हा घातपाताचा संशय लोणार पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्तीच्या खिशात बुलडाणा-लव्हाळा दरम्यानचे एसटीचे बस तिकीट आढळून आले आहे. मात्र मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही.
लोणार सरोवराच्या काठावरून गेलेल्या मंठा रस्त्याच्याकडेला उजव्या बाजूला हा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सकाळी सहा वाजता पडलेला आढळून आला. पहाटे फिरण्यास जाणार्र्या काही नागरिकांनी त्याची माहिती लोणार शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागरिकांनीही येथे गर्दी केली आहे. मृत व्यक्तीच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबलेला असल्याने हा घातपात असावा असा कयास पोलिस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, मृत व्यक्तीच्या खिशात १४ जून रोजीचे बुलडाणा-लव्हाळा बसगाडीचे तिकीट आढळून आले आहे. त्याच्या आधारावर सध्या पुढील तपास करीत आहेत.