लोणार : एसटी महामंडळाचे पर्यटकांकडे दुर्लक्ष; पर्यटन व्यवसायावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:18 AM2018-02-17T01:18:07+5:302018-02-17T01:20:05+5:30

लोणार : येथे येणार्‍या पर्यटकांकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असून,  आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर  परिणाम होत आहे. यासाठी लोणार येथे एसटी महामंडळाचे आगार सुरू करून  विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत आहे.

Lonar: Ignore tourists of ST corporation; Tourism business results! | लोणार : एसटी महामंडळाचे पर्यटकांकडे दुर्लक्ष; पर्यटन व्यवसायावर परिणाम!

लोणार : एसटी महामंडळाचे पर्यटकांकडे दुर्लक्ष; पर्यटन व्यवसायावर परिणाम!

Next
ठळक मुद्देआगार सुरू करण्याची मागणी!

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : येथे येणार्‍या पर्यटकांकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असून,  आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर  परिणाम होत आहे. यासाठी लोणार येथे एसटी महामंडळाचे आगार सुरू करून  विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत आहे.
जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक  दृष्टिकोना तून अतिशय महत्त्वाचे असल्याने दररोज शेकडो पर्यटक भक्त , विद्यार्थी शहरात  येतात; परंतु लोणार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार  नसल्याने लोणारकरिता मेहकर व इतर आगारातून बसफेर्‍या चालवून प्रवाशांची  तात्पुरती सोय करण्यात येते; परंतु शहरात येणार्‍या पर्यटकांना पाहिजे त्या प्रमाणात  राज्य परिवहन महामंडळाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना  अवाजवी खर्च मोजून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने पर्यटन  व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. अतिमहत्त्वाच्या बसफेर्‍या पूर्ववत व  नवीन बसफेर्‍या कायमस्वरूपी सुरू करण्याबाबत कारवाई न झाल्याने प्रवाशांच्या  हितासाठी ५ मार्च रोजी लोणार प्रवासी सेवा असोसिएशन अध्यक्ष शेख उस्मान  शेख दाउद साखळी उपोषणास बसणार आहेत.
जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या व  आवश्यक असलेल्या फेर्‍या सुरु करण्यासाठी लोणार येथील प्रवासी सेवा  असोसिएशनच्यावतीने अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या. मागणीनुसार काही  बसफेर्‍या सुरु करण्यात आल्या. नव्याने सुरु करण्यात आलेल्या बस फेर्‍यांना  प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिल्याने राज्य परिवहन मंडळाच्या उत्पनातही वाढ झाली  होती; परंतु खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग   परिवहन महामंडळाने अनेक लांब पल्ल्याच्या व अत्यंत महत्त्वाच्या बसफेर्‍या  बंद केल्या असल्याचे लोणार येथील प्रवासी सेवा असोसिएशनने नमूद करीत  त्यासंदर्भात १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई ये थील महाव्यवस्थापक यांना अत्यंत महत्त्वाच्या व काही नवीन फेर्‍या सुरु  कराव्या, अशी मागणी केली आहे; परंतु अतिमहत्त्वाच्या बसफेर्‍या पूर्ववत व  नवीन बसफेर्‍या कायमस्वरूपी सुरु करण्याबाबत कारवाई न झाल्याने प्रवाशांच्या  हितासाठी ५ मार्च रोजी लोणार प्रवासी सेवा असोसिएशन अध्यक्ष शेख उस्मान  शेख दाउद यांनी साखळी उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा महाव्यवस्था पक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना दिला आहे.

Web Title: Lonar: Ignore tourists of ST corporation; Tourism business results!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.