लोणार सरोवरातील झऱ्यांतील पाण्याचा मिळणार डाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:30 PM2019-09-15T13:30:14+5:302019-09-15T13:31:21+5:30
लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जागतिक आश्चर्य असलेल्या खाºया पाण्याच्या लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी खास प्रकारचे ‘व्ही नॉच’ उपकरण या झºयांवर लावण्यात येणार आहे.
वन्यजीव विभागाकडून प्रामुख्याने ते लोणार सरोवरातील रामगया या झºयासह असलेल्या अन्य झºयांवर ते बसविण्यात येणार आहेत. लोणार सरोवर संवर्धनासंदर्भात नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेच्या संदर्भाने उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशानुसार सरोवरातील झºयांवर हे ‘व्ही नॉच’ उपकरण बसविण्यात येणार आहे. प्रामुख्याने लोणार सरोवर व परिसरातील पाण्याचे रासायनिक पृथ:करण करण्याच्यादृष्टीकोणातून झालेली ही मोजदात उपयुक्त ठरणार आहे. या ‘व्ही नॉच’ उपकरणामुळे झºयांमधील पाणी प्रती मिनीट, प्रती तास किती पाणी खाºया पाण्याच्या या लोणार सरोवरात जाते याचे आकडे लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी गोळाकरणे गरजेचे झाले आहे. त्यातच सरोवर परिसरातील हे छोटे मोठे झरे अलिकडील काळात कमी झालेल्या पावसामुळे आटण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचाही या निमित्ताने अभ्यास करणे सोपे जाणार असल्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागीतील सुत्रांनी स्पष्ट केले. गायमूख झरा, सीतान्हानी येथील झरा यासह शाडो टेंम्पलनजीक असलेला झरा अलिकडील काळात उन्हाळ््यात आटण्याचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक पृथ:करण करण्यासाठी प्रत्यक्षात सरोवरात जाणाºया गोड्या पाण्याच्या परिणामांचाही अभ्यास करणे शक्य होणार आहे.
वन विभागाद्वारे हे ‘व्ही नॉच’ उपकरणे लावण्यात येणार असून त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग त्यांना सहकार्य करणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य असल्यामुळे लोणार सरोवरातील ही उपकरणे जीएसडीए थेट न लावता वन विभागाला त्यासाठी सहकार्य करणार आहे. (प्रतिनिधी)
भूजल सर्व्हेक्षण विभाग सहकार्य करणार
सरोवर परिसरातील या झºयांवर ही उपकरणे वनविभाग बसविणार आहे. त्यासाठी भूजल सर्व्हेक्षण विभाग अर्थात जीएसडीए संपूर्ण सहकार्य करणार आहे. पाण्याची मोजदाद करण्यासाठी या उपकरणार विशिष्ट प्रकारची मार्किंगही राहणार आहे.