लोणार सरोवर: जागतिक वारसा जतनासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 03:27 PM2019-11-29T15:27:56+5:302019-11-29T15:38:42+5:30

सर्वंकष आराखाडा निर्माण करण्याबाबत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने नागपूर खंडपीठाने सुचीत केले आहे.

Lonar Lake: Mechanisms must work in coordination to preserve world heritage | लोणार सरोवर: जागतिक वारसा जतनासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे

लोणार सरोवर: जागतिक वारसा जतनासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोणार सरोवर हे आपल्यामध्येच एक वैशिष्ट्यपूर्ण असे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे सार्वत्रिक स्वरुपातील एक वेगळे महत्त्व आहे. त्यादृष्टीने या ठिकाणाणाचे जागतिक वारसा म्हणून जतन व संवर्धन व्हावे यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून सर्वंकष आराखाडा निर्माण करण्याबाबत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने नागपूर खंडपीठाने सुचीत केले आहे.
सोबतच सरोवर संवर्धन व जतनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीला प्रत्यक्ष अनुषंगीक काम करताना भेडसावणाºया समस्या व अडचणीही त्यांनी खंडपीठासमोर बिनदिक्तपणे मांडण्याबाबतही खंडपीठात गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणी दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. या सोबतच येथे कुठलीही विकास कामे करताना इजेक्टा ब्लँकेट बाधीत होणार नाही, याची काळजी सर्वस्तरावर घेण्याबाबत निर्देशित केल्या गेले आहे. यापूर्वीच्या अभ्यासानुसार सर्व्हे नं. ३५८ ते ३४२ मध्ये हा इजेक्टा ब्लँकेट चांगल्या स्वरुपात आहे. सोबतच काळापाणी डॅम आणि किन्ही सेक्शनमध्येही तो चांगल्या स्वरुपात आहे. त्याचे जतन अपेक्षीत आहे. दुसरीकडे येथील विकास कामाच्या दृष्टीने होणारी कामे करताना त्यामुळे हा इजेक्टा ब्लँकेट बाधीत होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असून त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने नव्याने पाहणी करून इजेक्टा ब्लँकेट पसरलेल्या संपूर्ण भागाता एक नकाशाच तयार करण्याच्या सुचना खंडपीठाने दिल्या आहेत. अभ्यासाठी तो महत्त्वाचा असून वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांनी तो बाधीत होणार नाही, याची पूर्ण काळजी घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे.

इजेक्टा ब्लँकेट म्हणजे काय?
लाखो वर्षापूर्वी अश्नीच्या आघाताने लोणार सरोवर बनले. ज्यावेळी अश्नी ही ‘त्या’ त्या जागेवर पडली त्यावेळी तेथून हवेत उडालेला मलबा हा ज्या भागात पडला तो भाग म्हणजे इजेक्टा ब्लँकेट होय. थोडक्यात जमिनीवर अश्नीचा आघात होऊन ज्या भागात हवेत उडालेला मलबा पसरून त्याची झालेली एक चादर म्हणजेच इजेक्टा ब्लँकेट होय. दरम्यान, यावेळी झालेल्या उलथापालधीमुळे यामध्ये काही बदल झाले. वैज्ञानिक अभ्यासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असल्याने त्याच्या जतनावर भर दिला जात आहे.
सरोवराल शैवाल नियंत्रणासाठी प्रयत्न
४सरोवरात अलगी नामक शैवाल सातत्याने वाढते आहे. त्याचे नियंत्रण करण्यासाठीही उपाययोजना गरजेच्या आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा ते काढून टाकण्यासाठी वन विभागाने पावले उचलावली. मात्र त्याचा सविस्तर अभ्यास अपेक्षीत असून त्यासाठी राज्य शासनाची परवानगी प्रथमत: घ्यावी लागणार आहे. सोबतच सरोवर परिसरात अनधिकृतरित्या मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठीही पावले उचलणे आवश्यक असून वनविभागाने ती उचलावीत, असे ही खंडपीठाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Lonar Lake: Mechanisms must work in coordination to preserve world heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.