लोणार नगर परिषद निवडणूक; तीन दिवसात एकही नामनिर्देश नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:08 PM2019-03-03T15:08:26+5:302019-03-03T15:08:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणार: लोणार नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. मात्र २ मार्च पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.

Lonar Municipal Council elections; No nomination in three days! | लोणार नगर परिषद निवडणूक; तीन दिवसात एकही नामनिर्देश नाही!

लोणार नगर परिषद निवडणूक; तीन दिवसात एकही नामनिर्देश नाही!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: लोणार नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. मात्र २ मार्च पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. ३ व ४ मार्च रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख ७ मार्च जवळ आली आहे.
स्थानिक नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून भाजप नेत्यांनी शहरात बैठका घेत मुलाखती घेतल्या. दरम्यान उमेदवारी वर दावा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना-भाजप युती होण्याचे चित्र धूसर झाल्याचे दिसून येत आहे. १ मार्च रोजी भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांनी लोणार येथे बैठक घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी सानप, शहराध्यक्ष अविनाश शुक्ल, निर्मल संचेती, प्रकाश नागरे, विजय मापारी, सुरेश अंभोरे, मेहकर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शिव ठाकरे, शहराध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, शुभम बनमेरू, सुबोध संचेती, दिनकर डोळे, भगवानराव सानप, प्रकाश मुंढे, गणेश तांगडे यांचेसह पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जर चिन्हावर लढत असेल व नगराध्यक्ष उमेदवारी भाजपला मिळत असेल तरच शिवसेना सोबत युती करू असे बैठकी दरम्यान अ‍ॅड. शिवाजी सानप यांनी जिल्हाध्यक्षांकडे निर्धार व्यक्त केला. २ मार्च रोजी जळगाव जामोद मतदार संघ आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांनी लोणार शहरात पदाधिकाºयांची बैठक घेतली. मुलाखती दरम्यान अनेक इच्छुकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा ठोकत मीच कसा सरस आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर नगरसेवकाची उमेदवारी मागणाºयांनी प्रभागामध्ये आपलाच वोट असल्याचे सांगितले. यावेळी इच्छुकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. (प्रतिनिधी)

Web Title: Lonar Municipal Council elections; No nomination in three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.