लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:36+5:302021-02-17T04:41:36+5:30
मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृह येथे जिल्ह्यातील पर्यटन संबंधातील प्रश्नांवर आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीस केंद्रीय ...
मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृह येथे जिल्ह्यातील पर्यटन संबंधातील प्रश्नांवर आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीस केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सिंदखेड राजा नगराध्यक्ष सतीश तायडेही उपस्थित होते. यावेळी खा. जाधव यांनी लोणार, सिंदखेड राजा, शिवाय शेगाव येथील विकासात्मक प्रश्नांबाबत आग्रही भूमिका मांडली.
लोणार निसर्ग पर्यटनाच्या कामाकरिता अतिरिक्त निधी देण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केली. शिवाय प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेमध्ये लोणारचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा, अशीही मागणी याप्रसंगी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. कमळजा माता मंदिरापर्यंत सरोवराच्या काठावर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करण्याची मागणी ही त्यांनी केली.
राजवाड्याचा दरवाजा आज उघडणार
सिंदखेडराजा येथील राजवाड्याचा दरवाजा १७ फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार आहे. त्याप्रमाणे मातृतीर्थ विकास आराखड्यातील २५ कोटी रुपयांतील पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये उर्वरित कामे जलद गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आनंद सागर सुरू करा....
बुलडाणा जिल्ह्यात शेगावला येणाऱ्या भाविकांच्या सोबतच पर्यटनदृष्ट्या आनंद-सागर महत्त्वाचे ठरले होते. मात्र, काही कारणांमुळे ती सध्या बंद आहे. यासाठी सरकारी पातळीवरून आनंद-सागर पूर्ववत सुरू करण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंद-सागर देखील पूर्व सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.