लोणारच्या ‘इजेक्टा ब्लँकेट’चे जतन होणार; शेतकऱ्यांना नोटीस देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:59 IST2021-08-30T08:58:53+5:302021-08-30T08:59:00+5:30
जमीन मोजणीची तयारी भूमिअभिलेख विभागाने केली आहे.

लोणारच्या ‘इजेक्टा ब्लँकेट’चे जतन होणार; शेतकऱ्यांना नोटीस देणार
नीलेश जोशी/रहेमान नवरंगाबादी
बुलडाणा/लोणार : लोणार सरोवर परिसरातील इजेक्टा ब्लँकेटच्या जतनासाठी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वन्यजीव विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार लोणार सरोवराच्या दक्षिणेकडील भागातील मंठा रोडपासून पश्चिमेच्या असलेल्या भागातील जवळपास ८६ हेक्टर खासगी जमीन अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
जमीन मोजणीची तयारी भूमिअभिलेख विभागाने केली आहे. अलीकडील निरीक्षणानुसार संबंधित भागात इजेक्टा ब्लँकेट सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. लोणार सरोवर निर्मितीदरम्यान उल्केचा आघात होऊन उडालेला मलबा (इजेक्टा ब्लँकेट) अद्यापही काही भागात सुरक्षित आहे. या इजेक्टा ब्लँकेटची लांबी, रुंदी व अनुषंगिक माहिती संकलित करून त्याचे जतन करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने २०१९ मध्ये दिले होते.
शेतकऱ्यांना नोटीस देणार
जमीन अधिग्रहित करण्यासाठी पुन्हा सर्व शेतकऱ्यांना नोटीस देणार आहे. काहींपर्यंत त्या पोहोचल्या नसल्याने मोजणी स्थगित झाल्याची माहिती तालुका भूमिअभिलेख अधिकारी चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.