नेहरुंच्या मार्गदर्शनाने भारावले होते लोणारचे शिक्षक

By admin | Published: November 13, 2014 11:47 PM2014-11-13T23:47:42+5:302014-11-13T23:47:42+5:30

लोणार येथील शिक्षकांनी दिल्ली येथे घेतली होती पंडित नेहरू यांची भेट.

Lonar's teacher was inspired by Nehru's guidance | नेहरुंच्या मार्गदर्शनाने भारावले होते लोणारचे शिक्षक

नेहरुंच्या मार्गदर्शनाने भारावले होते लोणारचे शिक्षक

Next

लोणार (बुलडाणा): लहान मुलं ही वेलीवरच्या फुलासारखी असतात. सुशिक्षीत विद्यार्थ्यांंच्या हातून प्रगतीशिल भारत घडणार आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात. विद्यार्थ्यांंनी शिक्षकांकडून ज्ञान संपादन करुन देशाच्या विकासाला हातभार लावावा, असे मार्गदर्शन दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी १९५८ साली त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या चिखली येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांंना केले. विद्यार्थी दशेत अवघ्या काही मिनीटासाठी देशाच्या पंतप्रधानांशी झालेल्या भेटीमुळे येथील सेवानवृत्त शिक्षक माधवराव इंगळे यांच्या जीवनात क्रांती घडून गेली आणि इंगळे यांनी त्याच क्षणी शिक्षकी पेशा पत्करण्याचे ठरविले.
एखाद्या आदणीय व्यक्तीने केलेल्या मार्गदर्शनामुळे जीवनाला कशाप्रकारे कलाटणी मिळते याची प्रचीती येथील सेवानवृत्त शिक्षक माधवराव इंगळे यांच्याकडे पाहिल्यावर येते. १९५८ मध्ये विद्यार्थी दशेत इयत्ता दहावी मध्ये जिल्ह्यातील चिखली येथील आदर्श विद्यालयात शिक्षण घेत असताना इंगळे हे विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीत आग्रा, मथुरा, वृंदावन, अमृतसरसह दिल्ली येथे गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत विद्यालयाचे प्राध्यापक जनार्दन डांगे हे होते. त्यावेळी सहलीत विद्यार्थ्यांंना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना भेटण्याची संधी मिळाली. पंडीत नेहरुंना लहान मुलांचे आकर्षण होते. लहान मुलांमध्ये पंडीतजी चाचा नेहरु म्हणून प्रसिद्ध होते. शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांंमध्ये आदर वाढविला. त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत मह त्वाच्या हुद्दयावर कार्यरत आहेत. ३८ वर्षे शिक्षकाची नोकरी करणारे माधवराव इंगळे सन २000 मध्ये सेवानवृत्त झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी दिवंगत पंतप्रधान यांच्या भेटीने जीवनाला कशाप्रकारे कलाटणी भेटली या आठवणींना उजाळा दे तांना त्यांचे डोळे पानावल्याशिवाय राहत नाहीत.

Web Title: Lonar's teacher was inspired by Nehru's guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.