लोणार: ८८.८५ टक्के निकाल
By admin | Published: May 31, 2017 12:24 AM2017-05-31T00:24:23+5:302017-05-31T00:24:23+5:30
लोणार : तालुक्यात एकूण १७३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधील १५३८ विदयार्थी पास झाले तर तालुक्याचा एकूण निकाल ८८.८५ एवढा लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यात एकूण १७३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधील १५३८ विदयार्थी पास झाले तर तालुक्याचा एकूण निकाल ८८.८५ एवढा लागला आहे.
तालुक्यातून सर्वात अधिक निकाल हा अंजनी खुर्द येथील जनता आर्ट व कॉमर्स विद्यालयाचा तर शहरातून सर्वात अधिक निकाल श्री शिवाजी ज्यू. कॉलेज लोणारचा लागलेला आहे. तर उर्दू माध्यमातून सुलतानपूर येथील म.हुसेन उर्दू कॉलेज सुलतानपूरचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर तालुक्यातील सर्वात कमी भगवान बाबा महाविद्यालय लोणारचा लागलेला आहे. १२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, लोणार तालुक्यातील १४ महाविद्यालयातील १७३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये श्री शिवाजी ज्यूनिअर कॉलेज लोणारमधील सायन्स ९९.४६, आर्ट ८५.२४, कॉमर्स ९५.४५ एकूण ९४.०३ निकाल तर भगवान बाबा महाविद्यालय लोणार आर्ट ७४.१३, कॉमर्स ६३.६३, एकूण ७१.३५, वंसतराव नाईक महाविद्यालय बिबी सायन्स ९६.२९, आर्ट ६३.०२ एकूण ७८.८५, जनता आर्ट, कॉमर्स महाविद्यालय अंजनी खुर्द सायन्स ९९.३४ आर्ट ९५.०० एकूण ९८.१२ , सिद्धेश्वर महाविद्यालय सुलतानपूर सायन्स ९९.२५, आर्ट ८७.१७ एकूण ९४.८३ निकाल, महाराणा प्रताप लोणार आर्ट ९३.१८, इंदिरा गांधी उर्दू लोणार आर्ट ७९.१६, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय येवती आर्ट ८८.४०, शिवाजी हायस्कूल वढव सायन्स ९७.९५, आर्ट ८३.९२ एकूण ९०.४७, वसंतराव आर्ट व सायन्स आश्रमशाळा चोरपांग्रा सायन्स ९४.७३ आर्ट ६१.५३ एकुण ७७.९२, दुर्गा क.बनमेरू महाविद्यालय लोणार सायन्स ७३.१७, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हिरडव सायन्स ९८.६१, आर्ट ९५.२३ एकूण ९७.३६, म.हुसेन सौदागर उर्दू विद्यालय सुलतानपूर सायन्स १०० टक्के, जाकीर हुसेन उर्दू लोणार सायन्स ९२.८५ एमसीव्हीसी भगवान बाबा महाविद्यालय लोणार ९४.५९ तर वसंतराव नाईक बिबी ६५.५७ टक्के निकाल लागला आहे. लोणार तालुक्याचा एकूण निकाल हा ८८.८५ टक्के लागला आहे. मागील वर्षापेक्षा लोणार तालुक्यातील अनेक शाळेचा निकाल चांगला लागलेला आहे, तर अंजनी खुर्द या महाविद्यालयाने मागील वर्षाचा निकाल पुन्हा कायम ठेवत तालुक्यातुन पहिला क्रमांक पटकावला आहे, तर शहरातून शिवाजी महाविद्यालयाने आपली परंपरा कायम ठेवली आहे.