लोणार @ ९१.२६ टक्के; चार शाळांचा १०० टक्के निकाल
By Admin | Published: June 14, 2017 12:54 AM2017-06-14T00:54:29+5:302017-06-14T00:54:29+5:30
लोणार : लोणार तालुक्यात एकूण २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर २१५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून लोणार तालुक्याचा सरासरी निकाल ९१.२६ टक्के एवढा लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : लोणार तालुक्यात एकूण २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर २१५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून लोणार तालुक्याचा सरासरी निकाल ९१.२६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील ३७ शाळांपैकी तालुक्यात ४ शाळांचा १०० टक्के तर १९ शाळांचा ९० टक्केच्यावर निकाल लागला आहे.
यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय खळेगाव व विवेकानंद विद्या मंदिर लोणार, डॉ.जाकीर हुसेन उर्दू माध्य.हाय. लोणार, मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हाय.लोणार या चार शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी पुतळाबाई मा. विद्यालय लोणारचा ६४.७० टक्के इतका निकाल लागला आहे. तसेच शाळानिहाय निकालामध्ये श्री शिवाजी हायस्कूल लोणार ८८.४९, श्री शिवाजी हायस्कूल किनगाव जट्टू ९०.३६, जनता विद्यालय अंजनी खुर्द ९७.६७, वसंतराव नाईक विद्यालय बिबी ९६.८४, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार ९२.४५, शिवाजी विद्यालय वढव ९०.४७, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल हिरडव ९५.७७, वसंत आश्रम शाळा चोरपांग्रा ९७.८७, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल रायगाव ८८.८८, स्व.भास्करराव शिंगणे विद्यालय गुंजखेड ८८.४६, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल येवती ९४.०४, लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय वेणी ७९.५९, श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर ८०.६७, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल लोणार ९१.०२, महाराणा प्रताप हायस्कूल लोणार ९१.८९, शरद विद्यालय बिबी ९२.५० टक्के, छत्रपती शाहू महाराज विद्यालय भुमराळा ८२.८५, नॅशनल उर्दू हायस्कूल सुलतानपूर ९६, सरस्वती विद्यालय पांग्रा डोळे ९८.२४, ज्ञानदिप आश्रम शाळा तांबोळा ९५.६५, श्री शिवाजी विद्यालय सुलतानपूर ८४.४०, स्व.अण्णाभाऊ साठे नवजिवन विद्यालय सोमठाणा ८०.५५, गुरुकृपा आदिवासी विद्यालय अजिसपूर ९४.५२, स्व.पी.जाधव आदिवासी विद्यालय टिटवी ९८, स्व.हर्षाबाई सदावर्ते आश्रमशाळा कोयाळी ९२.६८, स्व.जे.डी. भुतडा कलानिकेतन विद्यालय कारेगाव ९५, गुरुकृपा माध्यमिक विद्यालय पिंपळनेर ९१.४८, सरस्वती विद्यालय वडगाव तेजन ८०.५५, गर्व्हमेंट एस.सी.बॉईज रेसीडेन्टल स्कूल लोणार ८७.५० टक्के लागला आहे.