अग्निशामक यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:59+5:302021-01-10T04:26:59+5:30

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये ९ जानेवारी रोजी पहाटे आग लागून त्यात १० नवजात बालकांचा ...

Lose the firefighting system renewal certificate | अग्निशामक यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो

अग्निशामक यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो

Next

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये ९ जानेवारी रोजी पहाटे आग लागून त्यात १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह मलकापूर, शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खामगाव येथील जिल्हा रुग्णालयात हा ‘रिॲलिटी चेक’ करण्यात आला. त्या वेळी ही बाब समोर आली.

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निशामक यंत्रे सुस्थितीत असली तरी दर ११ महिन्यांनी या यंत्रांची व आगीच्या संदर्भाने रुग्णालय सुरक्षित आहे की नाही यासंदर्भात सर्वेक्षण करून पालिकेच्या अग्निशामक दलाकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत पाच वर्षांत असे सर्वेक्षणच करण्यात आलेले नाही. तशी मागणीही पालिकेच्या अग्निशामक दलाकडे करण्यात आलेली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या सर्वेक्षणासाठी जवळपास १० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे १०० खाटांच्या स्त्री रुग्णालय व वर्तमान स्थितीत समर्पित कोविड रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणेची तपासणी व सर्वेक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२० रोजी पालिका प्रशासनास पत्र देण्यात आले आहे. येथील सर्वेक्षण व तपासणी सोमवारी केली जाणार असल्याचे पालिकेचे उपमुख्याधिकारी एस. के. लघाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दुसरीकडे एक महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग, नवजात शिशू केअर विभाग व इमारतीमधील अन्य ठिकाणचे इलेक्ट्रिकल बोर्ड, बटने व वायरिंग मात्र महावितरणच्या सहकार्याने बदलून घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

अतिदक्षता विभागात अग्निशामक यंत्राचा अभाव

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अग्निशामक यंत्रच लावण्यात आलेले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले. भांडारगृह, नवजात शिशू केअर युनिट आणि कॅज्युअल्टी विभागात अशी अग्निशामक यंत्र लावण्यात आलेले व सुस्थितीत असल्याचे पाहणीत समोर आले. इलेक्ट्रिकल फायररोधक म्हणून काम करणाऱ्या सीओटू प्रकारच्या अग्निशामक यंत्राचे प्रेशरही योग्य असल्याचे पाहणीत समोर आले. मात्र काही यंत्रांना आवश्यक असलेले नोझल नसल्याचे समोर आले.

कोट

एक महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्जरीची खोली व अन्य ठिकाणची वायरिंग सुस्थितीत करून नवीन स्वीच बसविण्यात आलेले आहेत. तसेच नवजात शिशू केअर विभागातील परिचारिका, डॉक्टर यांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण व सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत.

- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

Web Title: Lose the firefighting system renewal certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.