मेहकर तालुक्यात शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:16 AM2018-02-12T01:16:31+5:302018-02-12T01:16:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : तालुक्यात गारपीटीमध्ये जवळपास २५ गावातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करण्याच्या सुचना आ.संजय रायमुलकर यांनी तहसिलदार तथा संबधीत अधिकार्यांना दिल्या आहेत.
मेहकर तालुक्यात रविवारला सकाळी झालेल्या गारपीटीमध्ये शेकडो हेक्टरवरील गहू, हरबरा, मका, भाजीपाला, फळबाग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये विश्वी, जनुना, वडाळी, मांडवा-स-डोंगर, आंधृड्र, पारखेड, मोसंबेवाडी, सावंगी वीर, मोहदरी, सोनाटी, नांद्रा, भालेगांव, देउळगाव माळी, वडगांव माळी, सावंगी माळी, पार्डा, सुभानपूर, मादणी, आरेगांव, सावत्रा, मारोती पेठ, भालेगांव, पाचला, बार्हई, माळेगांव यासह इतर गावात सुध्दा गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. प्रभारी तहसिलदार मिरा पागोरे, नायब तहसिलदार वैशाली जायगुडे, मंडळ अधिकारी रामराव चनखोरे, राजेश रहाटे, अजय पिंपरकर, येउल, तलाठी विजेंद्र धोंडगे, अंभोरे, जोशी, खरात, उंबरकर, संबधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे सुरु केला. मेहकर व लोणार तालुक्यात अचानक गारपीट होऊन झालेल्या नुकसानीचा तात्काळ सर्वे करावा अश्या सुचना आ.संजय रायमुलकर यांनी संबधीत अधिकार्याला दिल्या आहेत.