अति पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, केळीचे नुकसान; ९५ गावे बाधित
By विवेक चांदुरकर | Published: July 9, 2024 06:50 PM2024-07-09T18:50:11+5:302024-07-09T18:50:39+5:30
खामगाव मंडळातील आवर महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे.
खामगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तालुक्यातील ९५ गावांना याचा फटका बसला असून सोयाबीन, कापूस, तूर, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अंदाजित ७ हजार १६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांच्या काठची शेत जमीन खरडून गेली आहे. खामगाव मंडळातील आवर महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यामध्ये रविवारी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. सध्या महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून अंदाजित नुकसान व्यक्त करण्यात आले आहे. ज्यामध्ये तालुक्यातील प्रमुख पिके ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, केळी यांचे नुकसान झाले आहे. तसेच ९५ गावांना याचा फटका बसला आहे. अंदाजित ७ हजार १६० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. सोबतच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी शेतात गेल्याने जमीन खरडून गेली आहे.
अतिवृष्टीचा फटका तालुक्यातील ९ हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. ज्यामध्ये खामगाव मंडळातील आवर महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये आवर, पिंपरी, गवळी, नागपूर विहिगांव, रामनगर, मक्ता, रोहना या गावांना ही जास्त फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. यासोबतच प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. सध्या पाणी ओसरल्यामुळे आता पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.
कृषी विभागाकडून शेतीची पाहणी करण्यात आली आहे. आम्ही नुकसानीची पाहणी केली असून सध्या आकडेवारी अंदाजित आहे. पाणी ओसरल्यामुळे पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.
- एस. के. धुमाळ, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.