पाटाच्या पाण्यामुळे शेतक-यांच्या सीड प्लॉटचे नुकसान
By Admin | Published: January 26, 2017 10:01 AM2017-01-26T10:01:45+5:302017-01-26T10:01:45+5:30
विद्रूपा धरणातील पाटाच्या पाण्यामुळे शेतक-यांच्या वांग्याच्या सीड प्लॉटचे नुकसान झाले आहे.
सिंदखेड राजा(बुलडाणा), दि. २५- विद्रूपा धरणातील पाटाच्या पाण्यामुळे शेतकर्यांच्या वांग्याच्या सीड प्लॉटचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील धानोरा येथे विद्रूपा धरण आहे. सदर धरणातील पाण्याचा पाट शेतकर्यांच्या शेतामधून गेला आहे. सध्या सदर पाटाचे पाणी शेतातील पिकासाठी सोडल्या जात आहे. त्या पाटातील वाढलेले गवत, झाड, झुडपे साफसफाई न करता पाटाने पाणी सोडण्यात आले. पाणी मोठय़ा प्रमाणात झिरपत आहे. झिरपणार्या पाण्यामुळे बिजो शीतल सीड्स कंपनीचा वांग्याचा प्लॉट जादा पाण्यामुळे करपून गेला. त्यामुळे डिगांबर वायाळ यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी डिगांबर वायाळ यांच्यासह शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकार्यांकडे केली आहे.
दोन वर्षांपासून धरण कोरडे पडले होते. यावर्षी चांगला पाऊस पडला. वास्तविक पाहता पाटाचे पाणी सोडण्याअगोदर पाटातील गवत, झाड, झुडपे काढून साफसफाई करावयास पाहिजे होती; परंतु, संबंधित यंत्रणेने काही न करताच पाणी सोडले व पाटाचे पाणी झिरपून शेतकर्याचे नुकसान झाले. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.