स्मार्ट फोनसाठी लॉटरीच्या दुकानात केली चोरी; अल्पवयीन आरोपीकडून मोबाईल जप्त

By अनिल गवई | Published: September 26, 2023 06:56 PM2023-09-26T18:56:08+5:302023-09-26T18:56:27+5:30

स्मार्ट फोनसाठी चक्क एका लॉटरीच्या दुकानात १८ हजार ३०० रुपयांची चोरी करण्यात आली.

Lottery Shop Steals for Smart Phones Mobile phone seized from minor accused | स्मार्ट फोनसाठी लॉटरीच्या दुकानात केली चोरी; अल्पवयीन आरोपीकडून मोबाईल जप्त

स्मार्ट फोनसाठी लॉटरीच्या दुकानात केली चोरी; अल्पवयीन आरोपीकडून मोबाईल जप्त

googlenewsNext

खामगाव : स्मार्ट फोनसाठी चक्क एका लॉटरीच्या दुकानात १८ हजार ३०० रुपयांची चोरी करण्यात आली. चोरी केलेल्या रक्कमेतून स्मार्ट फोन खरेदी केलेल्या एका अल्पवयीन चोरट्याला पकडून त्याच्या जवळून मोबाईल व हेड फोन जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, स्थानिक अग्रेसन चौकातील लॉटरीच्या दुकानातून एका अल्पवयीन चोरट्याने रविवार २४ सप्टेंबर रोजी १८ हजार ३०० रुपये चोरले. ही घटना काही वेळाने उघडकीस आली. दरम्यान, दुकानातील सीसी कॅमेर्यांमधील फुटेज तपासल्यानंतर अल्पवयीन चोरटा दुकानातील कामगाराला बोलण्यात गुंतवून चोरी करताना आढळून आला. त्यानंतर याप्रकरणी संजय गोरले यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीस पकडण्यात आले. त्याच्या जवळून मंगळवारी मोबाईल आणि हेड फोन जप्त करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Lottery Shop Steals for Smart Phones Mobile phone seized from minor accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.