प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:11 IST2020-09-26T16:11:28+5:302020-09-26T16:11:54+5:30
प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव : श्री क्षेत्र नागझरी येथील रेल्वे पुलानजीक डोंगरगावच्या अल्पवयीन प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
डोंगरगाव ता बाळापूर येथील अल्पवयीन मुलगी व भागवत मधुकर वाघमारे अंदाजे वय 20 यांनी धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलीसांनी दिली.माहिती मिळताच रेल्वे पो स्टे चे ठाणेदार सागर गोळे यांचे मार्गदर्शनाखाली बाळू मेजर व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दरम्यान दोघांचे मृतदेहाचे तुकडे झालेले होते.मृतदेह सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रूग्णालय शेगाव येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी रेल्वे पो स्टे मध्ये आकस्मिक मृत्यु ची नोंद केली.