शेगावात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस !
By admin | Published: July 17, 2014 12:39 AM2014-07-17T00:39:43+5:302014-07-17T00:44:27+5:30
मागील तीन वर्षांतील सर्वांत कमी पाऊस
शेगाव: पावसाळा सुरुवात व्हायला दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप पर्यंंत पेरणी योग्य पावसाने हजेरी न लावण्याने शेगाव तालुक्यातील पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र मंगळवारी तालुक्यात ३0 मी.मी. झाल्याने पेरणीला सुरुवात होणार आहे.
मागील तीन वर्षांंत आतापर्यंंत सर्वांंत कमी पाऊस या वर्षी झालेला आहे. सन २0११ मध्ये १५ जुलै पर्यंंत २९३ मी.मी, १५ जुलै २0१२ मध्ये २४६ मी.मी, १५ जुलै २0१३ मध्ये ३७५ मी.मी पाऊस पडलेला होता.मात्र या वर्षी १६ जुलै २0१४ पर्यंंत ६५ मी.मी पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने या वर्षी तालुक्यातील गावामध्ये पाणी टचाईची झळ अद्यापपर्यंंत तरी पोहचलेली नाही.
अशी माहीती शेगावचे तहसीलदार डॉ. रामेर्श्वर पुरी यांनी लोकमतशी बोलतांना दिली. मंगळ्वारी सर्वाधिक पाऊस देऊळगांवराजा तालुक्यात ३४ मि.मी तर (मि.मी) शेगांव ३0, बुलडाणा ३, चिखली ७, मेहकर २८, लोणार २८,सिंदखेडराजा ९.0८, मलकापूर ३, नांदुरा ३, खामगांव ३.८0, जळगांव जामोद १२ व संग्रामपूर येथे १२ मि.मी पाऊस झाला आहे.