शेगावातील लॉजवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:02 AM2017-09-18T01:02:36+5:302017-09-18T01:03:03+5:30

शेगावात शनिवारी रात्री २0 ते २२ लॉज आणि हॉटेलवर डीवायएसपी पथकाने छापे मारले असता त्यामध्ये २८ तरुण व २४ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पो.स्टे.ला आणून तरुणांविरुद्ध ११0, ११७ ची कारवाई करण्यात आली, तर तरुणींना समज देण्यात आली. तसेच एका महिलेसह ५ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Luge police raids in Shegawa | शेगावातील लॉजवर पोलिसांचे छापे

शेगावातील लॉजवर पोलिसांचे छापे

Next
ठळक मुद्देपाच जणांवर गुन्हे दाखल २८ तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई २४ तरुणींना दिली समज

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेगावात शनिवारी रात्री २0 ते २२ लॉज आणि हॉटेलवर डीवायएसपी पथकाने छापे मारले असता त्यामध्ये २८ तरुण व २४ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पो.स्टे.ला आणून तरुणांविरुद्ध ११0, ११७ ची कारवाई करण्यात आली, तर तरुणींना समज देण्यात आली. तसेच एका महिलेसह ५ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात व डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात रात्री ११.३0 वाजता पोलिसांच्या पथकांनी ठिकठिकाणी छापे मारून लॉज व हॉटेलची झाडाझडती घेतली. यामध्ये जवळपास २३३ जणांची तपासणी करण्यात आली. या छाप्यांमुळे शहरातील हॉटेल व लॉजधारकांमध्ये खळबळ माजली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत आढळलेल्या मुला-मुलींना पाहण्यासाठी पो.स्टे. बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. तर गाडगेबाबा चौकातील गोपाल गेस्ट हाऊसमध्ये मारलेल्या छाप्यात चिखली येथील तरुण व निमकर्दा येथील तरुणीस पकडण्यात आले. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ठिकठिकाणी देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी मिळून आल्याने डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गोपाल रमेश उमाळे, संजय मोहोड, भागवत किसन दांडगे हिवरा, चेतन दिलीप जामोदकर (वय २४) पारस व एक महिला यांच्या विरुद्ध अप नं. ४0६/१७ ३,४,५, स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार कायदा १९५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
काही गेस्ट हाऊस व लॉजवर मिळालेल्या २८ युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर २४ तरुणी, महिलांना समज देऊन सोडण्यात आले आहे. ही कारवाई करणार्‍या पथकांमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर थोरात, कोळी, मोरे, शेख जावेद महिला पोलीस कर्मचारी चंदा शिंदे, निगरुण सोनटक्के, ज्योती धंदर, शेख अंजुम, संध्या ताठरकर, कोमल इंगळे यांच्यासह शेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील, पीएसआय तायडे, चौधरी, इंगळे आदींचा समावेश होता.
 

Web Title: Luge police raids in Shegawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.