आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष: दहा लाखा रुपयांना गंडविले

By अनिल गवई | Published: August 16, 2024 03:12 PM2024-08-16T15:12:47+5:302024-08-16T15:13:03+5:30

आरोग्य विभागाचा नियुक्ती आदेश निघाला खोटा.

Lure of employment in health department 10 lakhs swindled | आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष: दहा लाखा रुपयांना गंडविले

आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष: दहा लाखा रुपयांना गंडविले

लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका ३८ युवकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, खामगाव तालुक्यातील कुंबेफळ येथील बळीराम त्र्यंबक सावरकर या युवकाला लिलाधर सदाशिव खवले (६६, ) आणि नरहरी लिलाधर खवले (४५) रा. कठोरा ता. शेगाव. ह.मु. स्वामी टॉवर, समन्वय नगर खामगाव यांनी १० मे २०२० रोजी आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदाची भरती सुरू असल्याचे सांगितले दोघांनी विश्वास संपादन केला. नोकरीसाठी संबंधितांनी दहा लाखांची मागणी केली. त्यावेळी आपण नातेवाईक तसेच सतीश शहाणे आणि गणेश टवलारकर यांच्याकडून रक्कमेची जुळवा जुळव करून १५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता दोन्ही आरोपींना गणेश तुळशीराम टवलारकर, सतीश हरिभाऊ शहाणे यांच्या समक्ष समन्वय नगराजवळील भुयारी मार्गाजवळ दिले.

त्यानंतर संबंधितांनी आरोग्य सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य) चे जा पत्र क्रमाका जा रजि.प/आस्था/२६३/२०२०/४६६ दि०३.०९.२०२० रोजीचे असे नियुकी पत्र दिले. नियुक्ती पत्र देदुन अनेक दिवस उलटुनही आपल्याला कामावर रुजू न केल्यामुळे आपण खामगाव ग्रामीण रुग्णालय चौकशी केली असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याचे समजताच संबधिंतांना गणेश टवलारकर यांच्यासोबतच लिलाधर सदाशिव खवले व नरहरी लिलाधर खवले यांची भेट घेतली. त्यांना दिलेले दहा लाख रुपये परत मागीतले. त्यावेळी संबंधितांनी सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखेचा धनादेश दिला. तो धनादेश परत आल्याचे व्यक्तीने तक्रारीत म्हटले. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी आरोपी विरोधात (तक्रार १ जुलै पूर्वीची असल्याने ) भादंवि कलम ४२०, ५०४, ३४ अन्वये १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Lure of employment in health department 10 lakhs swindled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.