लक्झरी बसची कारला धडक; एक ठार, दोन जखमी

By admin | Published: June 26, 2017 10:20 AM2017-06-26T10:20:18+5:302017-06-26T10:20:18+5:30

भरधाव लक्झरी बस व कार या दोन वाहनात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

Luxury car hits Carla; One killed, two injured | लक्झरी बसची कारला धडक; एक ठार, दोन जखमी

लक्झरी बसची कारला धडक; एक ठार, दोन जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: नजीकच राष्ट्रीय महामार्गावर स्थित वीर जगदेवराव सूतगिरणीसमोर भरधाव लक्झरी बस व कार या दोन वाहनात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
कार क्र. एम. एच. ०४/डी. एन. ४३११ चंद्रपूरवरून मुुंबईकडे निघाली होती. शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वरील सूतगिरणीसमोर विरुद्ध दिशेने भरधाव आलेली लक्झरी बस क्र.बी.टी.९६९६ कारवर आदळली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा होऊन चालक जयदेव हलदर (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पंकज शामसुंदर ढाबेराव (वय ३५) व कपिल पिंपल शेंडे (वय ३८) रा. चंद्रपूर असे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत शहर पोलिसांनी विनोद गणुजी राठोड (वय ३१) रा. धामणगावदेव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालक सुमेध बाबुराव तायडे (वय ३३) रा. गोंधनापूर यांच्याविरुद्ध कलम २७९,३३७,३३८, ३०४,अ,४२७ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर गवारगुरू करीत आहे.

Web Title: Luxury car hits Carla; One killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.