बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांतही महाविकास आघाडीचे वर्चस्व

By निलेश जोशी | Published: April 30, 2023 10:31 PM2023-04-30T22:31:51+5:302023-04-30T22:32:08+5:30

भाजप-शिवसेनेला धक्का: लोणारमध्ये शिवसेनेचे पॅनल विजयाच्या दिशेने

Maha Vikas Aghadi dominated the second phase of elections in Buldhana bajar samiti election | बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांतही महाविकास आघाडीचे वर्चस्व

बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांतही महाविकास आघाडीचे वर्चस्व

googlenewsNext

बुलढाणा: जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांपैकी दुसऱ्या टप्प्यातील पाच बाजार समित्यांची निवडणूक ३० एप्रिल रोजी झाली. यामध्ये शेगाव, चिखलीमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा एकतर्फी पराभव केला तर नांदुऱ्यामध्ये महाविकास आघाडीची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.

जळगाव जामोदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा राज्य पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या पॅनलनेही भाजप व सहकारी मित्र पक्षांच्या गटाला धक्का दिली आहे. दरम्यान जळगाव जामोदमध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी तीन वेळा फेरमतमोजणी करण्यात येत होती. त्यामुळे येथील चित्र काहीसे अस्पष्ट असले तरी प्रसेनजीत पाटील यांच्या पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

शेगावात भाजपचा सफाया
शेगाव येथील बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने १८ च्या १८ जागा जिंकत भाजपला धोबीपछाड दिली आहे. शेगाव बाजार समितीमध्ये गजाननदादा पाटील आणि त्यानंतर आता पांडुरंगदादा पाटील आणि ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या पॅनेलने तब्बल ४५ वषापासून आबाधीत असलेली सत्ता यंदाही कायम ठेवली आहे. यावेळी तर त्यांनी सर्वच्या सर्व १८ जागा काबीज केल्या आहेत. हा एक विक्रमच म्हणावा लागले. आ. संजय कुटे यांना हा मोठा धक्का म्हणावा लागले.

चिखलीत महाविकास आघाडी
येथील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झााल असून त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले. बाकी सर्व १७ जागा या महाविका आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे यांच्या पॅनेलने पटकावल्या आहेत. जिल्ह्याची सांस्कृतिक तथा राजकीय राजधानी म्हणून चिखली परिचीत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीमधील कौल आगामी निवडणुकांमध्ये कोणता ट्रेन्ड आणतो याकडे लक्ष लागून रहाले आहे.

नांदुऱ्यात महाविकास आघाडीची आगेकूच
काँग्रेसचे आ. राजेश एकडे यांचे हाेम टाऊन असलेल्या नांदुऱ्यातील बाजार समितीमध्ये १३ जागा मिळवत महाविकास आघाडीने विजयाची आगेकचू कायम ठेवली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या पॅनला येथे पाच जागांवर समाधान मानावे लाले आहे. येथील निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायत मतदारंसघात महाविकास आघाडीने सर्वच जागा जिंकल्या आहेत.

जळगावमध्ये प्रसेनजीत गटाचे वर्चस्व
जळगाव जामोद बाजार समितीमध्ये माजी मंत्री तथा वि. आमदार संजय कुटे यांच्या गटाला धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रसेनजीत पाटील व त्यांच्या मित्र पक्षाच्या सहकाऱ्यांनी शेवटचा निकाल हाती आला तोवर १८ पैकी ११ जागा घेतल्या होत्या. आ. डॉ. संजय कुटे यांच्या गटाकेड ७ जागा होत्या. दरम्यान सेवा सहकारी संस्था मतदार संघातील ७ जागांसाठी येथे तीन वेळा फेरमतमोजणी झाली. त्याचा निकाल मात्र स्पष्ट झालेला नाही. वास्तविक येथील उभय पॅनमध्ये पक्षीय पदाधिकाऱ्यांचे झालेले मिश्रण पहाता प्रसेनजीत पाटील विरुद्ध आ. डॉ. कुटे असाच सामना येथे रंगत असल्याचे चित्र आहे.

लोणारमध्ये अतितटीची लढत
लोणार येथे खा. प्रतापराव जाधव यांचे पॅनल आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये अतितटीची लढत होत आहे. येथे शिवसेने ९ जागांवर तर महाविकास आघाडीने ४ जागांवर विजयी झाली आहे. येथे खा. प्रतापराव जाधव (शिंदे गट) यांचे पॅनेल थोडक्यात विजयाच्या जवळ पोहोचत असल्याचे एकंदरीत चित्र रात्री दहा वाजेच्या सुमारा होते. लोणारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी यांचा पराभव करत शिंदे गटाला आघाडी मिळवून दिली होती.

बाजार समितीसाठी ९६.९९ टक्के मतदान
प्रारंभी पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत ९६.९९ टक्के मतदान झाले आहे. ८ हजार २४१ मतदारांपैकी ७ हजार ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Web Title: Maha Vikas Aghadi dominated the second phase of elections in Buldhana bajar samiti election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.