देऊळगाव राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

By ब्रह्मानंद जाधव | Published: April 29, 2023 04:55 PM2023-04-29T16:55:00+5:302023-04-29T16:56:13+5:30

भाजपा-सेनेला दोन जागा, तर अपक्ष उमेदवाराला ईश्वर चिठ्ठीने तारले

maha vikas aghadi dominates the deulgaon raja bazar committee buldhana | देऊळगाव राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

देऊळगाव राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

googlenewsNext

देऊळगाव राजा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने निर्विवादपणे आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गटाला दोन जागा मिळाल्या. एका जागेवर ईश्वर चिठ्ठीने अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत.

स्थानिक मतदारसंघातील माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सहकार क्षेत्रावर पकड अतिशय मजबूत असून, त्याचाच प्रत्यय झालेल्या निवडणुकीत दिसून आला. माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनीसुद्धा निवडणूक आखाड्यात योग्य पद्धतीने रचना केलेली होती. त्याला शह देण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी स्थापन झालेली असताना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले. त्यामध्ये स्वतः आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवानंद कायंदे, शिवसेनेचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले होते. त्याच पद्धतीने माजी आ. शशिकांत खेडेकर, भाजपाचे डॉ. गणेश मांटे, डॉ. सुनील कायंदे या सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये १८ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. यामध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार हे अविरोध निवडून आले. त्यामध्ये राहुल जैन आणि अनिल धनावत हे दोन उमेदवार व्यापारी अडते मतदारसंघातून अविरोध आले.

असे आहेत विजयी उमेदवार

महाविकास आघाडीचे नारायण कोल्हे, संतोष खांडेभराड, गणेश डोईफोडे, भरत पऱ्हाड, समाधान शिंगणे, रामप्रसाद शेळके, भाजपा-सेनाचे बद्रीनाथ शिंदे अपक्ष ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. इतर मागासवर्गीयमधील एका जागेसाठी महाविकास आघाडीचे लक्ष्मण शिंगणे यांचा विजय झाला. विमुक्त जाती भटक्या जमाती एका जागेसाठी महाविकास आघाडीचे दादाराव खार्डे विजयी झाले. महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागेसाठी महाविकास आघाडीच्या शोभा कणखर आणि संध्या देशमुख यांचा विजय झाला. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाच्या दोन जागेसाठी महाविकास आघाडीचे शिवहरी बुरकूल, शंकर शिंगणे विजयी झाले. ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती-जमाती एका जागेसाठी महाविकास आघाडीचे भगवान खरात, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी महाविकास आघाडीचे निवृत्ती नागरे यांचा विजय झाला. हमाल मापारी मतदारसंघातील एक जागेसाठी भाजपा शिवसेनेचे अभय दिडहाते यांचा विजय झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: maha vikas aghadi dominates the deulgaon raja bazar committee buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.