महाबिजचे बियाणे निघाले वांझोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:46 PM2017-09-06T19:46:21+5:302017-09-06T19:46:30+5:30
एक खात्रीचे बियाणे म्हणून महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची निवड शेतकरी करतात. मात्र जानेफळ परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात केवळ मोठ्या प्रमाणात सोयाबीनची झाडेच वाढली असून फूल व आणि शेंगा लागल्याचे नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ (मेहकर) : एक खात्रीचे बियाणे म्हणून महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची निवड शेतकरी करतात. मात्र जानेफळ परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात केवळ मोठ्या प्रमाणात सोयाबीनची झाडेच वाढली असून फूल व आणि शेंगा लागल्याचे नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
पिकांना चांगली झडती लागावी म्हणून अनेक शेतकºयांनी महाबीजच्या जेएस ३३५ हे सोयाबीन बियाणे खरेदी करुन त्याची पेरणी शेतात केली. या बियाण्यांचे झाडे चांगल्या प्रकारे उगवली असून गुडघ्याच्या वरपर्यंत त्याची वाढ झालेली आहे. मात्र या बियाणांच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात लखपती जातीचे सोयाबीन बियाणे सुद्धा मिसळलेले निघाल्याने या लखपती जातीच्या उगवलेल्या झाडांना अद्याप एकही फुल व शेंग लागली नाही. या शेतकºयांनी बियाणे खरेदी केलेल्या कृषी केंद्र मालकांकडे धाव घेतली. त्यामुळे त्यांनी महाबीजच्या कार्यालयास कळविले. मात्र, त्यांना उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आले. पेरणीनंतर निंदन, डवरणी तसेच ३ ते ४ वेळा कीटकनाशकांची फवारणी करीत हजारो रुपयांचा खर्च शेतकºयांनी केला. परंतु, बियाण्यांमध्ये फसगत झाल्याने खर्च सुद्धा वसुल होईल किंवा नाही याची शाश्वती दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.