"महाबीज"चे सोयाबीन उगवलेच नाही!

By admin | Published: July 14, 2017 07:49 PM2017-07-14T19:49:03+5:302017-07-14T19:49:03+5:30

दोषींवर कारवाई व्हावी - जालिंधर बुधवत

"Mahabeej" soybean did not grow! | "महाबीज"चे सोयाबीन उगवलेच नाही!

"महाबीज"चे सोयाबीन उगवलेच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भावमंदीचा मारा सहन केलेल्या शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. हक्काच सोयाबीन पीक घेवून पुन्हा संकटाचा सामना करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र बीज महामंडळाकडून बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून हे बियाणे उगवलेच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासंबंधी दोषींवर चौकशी करुन कारवाई व्हावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकरी आधीच संकटात सापडलेला असताना आधार म्हणून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे असताना शासनाच्याच महाबीज महामंडळाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले सोयाबीन बियाणे खराब निघाले. ज्या शेतकऱ्यांनी या बियाण्यांची पेरणी केली त्यातील बहुतांश शेतात बियाणे उगवलेच नाही. बुलडाणा तालुक्यातील सोयगाव, मासरुळ सह जिल्ह्यातील अनेक भागाात अशी उदाहरणे समोर आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आ.डॉ.शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, संजय गायकवाड, ऋषिकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, किसान सेना उप जि.प्र.लखन गाडेकर, नगरपालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, पं.स.सदस्य दिलीप सिनकर, राजु पवार, माजी जि.प.विरोधी पक्षनेता अशोक इंगळे, माजी पं.स.सदस्य सुधाकर आघाव, राजु मुळे, गजानन दादा मुठ्ठे, विजय इतवारे, गजानन टेकाळे, माणिकराव सावळे, प्रभाकर काळवाघे, शरद टेकाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Web Title: "Mahabeej" soybean did not grow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.