पहाटे पावणे सहाच्या ठोक्याला माँसाहेब जिजाऊंची वंशजांकडून महापूजा
By संदीप वानखेडे | Updated: January 12, 2024 09:09 IST2024-01-12T09:09:03+5:302024-01-12T09:09:42+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने अध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महापूजा केली.

पहाटे पावणे सहाच्या ठोक्याला माँसाहेब जिजाऊंची वंशजांकडून महापूजा
सिंदखेडराजा:: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२६व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या प्रतिमेची महापूजा करण्यात आली. शहरासह तालुक्यातील जाधव वंशज यांनी सपत्नीक महापूजा केली.
यावेळी राजे विजयसिंह जाधव, शिवाजीराजे जाधव, रमेश राव व निर्मला राजे जाधव, अभय सिंह राजे जाधव, विठ्ठल राजे जाधव, आशिष राजे जाधव यांच्यासह किनगाव राजा, उमरद, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा येथील वंशज यावेळी उपस्थित होते.
नगर परिषदेची महापूजा
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने अध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महापूजा केली. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, सर्व पक्षीय नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
राजवाडा विविध रंगी फुलांनी नटला
राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या स्थानाला विविध रंगी फुलांनी सजविण्यात आले होते. संपूर्ण राजवाडा राजवाडा प्रकाशमान झाला होता. महिला, पुरुष, युवकांनी आकर्षक पेहराव करून जिजाऊंना अभिवादन केले.