उदावंत दाम्पत्याच्या हस्ते वैष्णव गडावर महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:08+5:302021-07-22T04:22:08+5:30
दरवर्षी वैष्णवगडावर हजारोंच्या संख्येने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात़ यावर्षी मात्र कोरोनाच्या काळामध्ये भक्तांना दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्षात मंदिरात ...
दरवर्षी वैष्णवगडावर हजारोंच्या संख्येने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात़ यावर्षी मात्र कोरोनाच्या काळामध्ये भक्तांना दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्षात मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी बंदी घातली होती़ तरीही विठ्ठलभक्ताला गैरसोय होऊ नये यासाठी समितीने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती़ वैष्णवगडावर महापूजा ही ५ जणांच्या उपस्थित झाली़ वैष्णवगडावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती़ यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आली़ वैष्णवगडावर लायटिंगची व्यवस्था करण्यात आली हाेती़ सानप गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाना महाराज पोखरीकर, रमेश महाराज जायभाये, श्रीनिवास पोखरीकर, सखाराम बुरुकुल, केशव घुगे, प्रल्हाद घुगे, प्रल्हाद केदार, बबनराव उदावंत, ज्योती उदावंत, सुखदेव ताठे, त्रिवेणी देशमुख, सुरेशराव कुलथे, ज्ञानेश्वर कुलथे, पंढरीनाथ महाराज घुगे व देशपांडे गुरुजी उपस्थित होते़ यावेळी महसूल व पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक राम पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ काेराेना महामारी लवकरात लवकर जावो व आपल्या महाराष्ट्रात पाऊस चांगला पडो, अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली, असे वसंतराव उदावंत यांनी सांगितले़