Maharashtra Assembly Election 2019 : डॉक्टर, प्राध्यापक, वकिलांमध्ये लागली ‘रेस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:51 PM2019-10-14T14:51:15+5:302019-10-14T14:51:20+5:30

आता कोणत्या डॉक्टरचे इंजेक्शन ‘पॉवरफुल’ ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

Maharashtra Assembly Election 2019: 'Race' starts in doctors, professors, lawyers! | Maharashtra Assembly Election 2019 : डॉक्टर, प्राध्यापक, वकिलांमध्ये लागली ‘रेस’!

Maharashtra Assembly Election 2019 : डॉक्टर, प्राध्यापक, वकिलांमध्ये लागली ‘रेस’!

Next

ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  जिल्ह्यातील सातही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता सध्या डॉक्टर, प्राध्यापक वकिलांमध्ये रेस सुरू असल्याचे दिसून येते. यामध्ये सिंदखेड राजा व जळगाव जामोद या मतदारसंघात तर थेट लढतच ‘डॉक्टर-डॉक्टर’ अशी होत आहे. मेहकर, मलकापूर व खामगावातही डॉक्टर, प्राध्यापक व वकिल निवडणूक रिंगणात आहेत.  त्यामुळे आता कोणत्या डॉक्टरचे इंजेक्शन ‘पॉवरफुल’ ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 
निवडणुकीमध्ये उतरणाºया उमेदवारांमध्ये शिक्षणाचा अभाव ही मोठी समस्या असते. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात बहुतांश उमेदवार हे उच्च शिक्षित दिसून येत आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतक्याच उमेदवारांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंतचे झालेले आहे. मतदारराजाही आता सुज्ञ झाल्यामुळे उमेदवारांच्या शिक्षणाला महत्त्व देत आहे. 

बुलडाणा मतदारसंघ
बुलडाणा मतदारसंघातील हर्षवर्धन सपकाळ हे बी.कॉम, बी. पी. एड् आहेत. तर विजयराज शिंदे बी. कॉम., योगेंद्र गोडे बी.एस.सी आहेत. तर संजय गायकवाड नववी झाले आहेत.
चिखली मतदारसंघ
चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल बोंद्रे (बी. ई. सीव्हील) व श्वेता महाले (डी. फार्मसी) यांच्यात लढत होत आहे. इंजीनीअर आणि फार्मासीस्टची ही टक्कर सध्या मजेदार सुरू आहे.


मेहकर मतदारसंघ
मेहकर मतदारसंघामध्ये डॉक्टर, वकिल व प्राध्यापक रिंंगणात आहेत. शिवसेनेचे डॉक्टर रायमुलकर, काँग्रेसचे वानखेडे वकिल व वंचित बहुजन आघाडीचे वाघ हे प्राध्यापक आहेत.


सिंदखेड राजा मतदारसंघ
सिंदखेड राजामध्ये थेट लढत ‘डॉक्टर-डॉक्टर’ यांच्यामध्येच आहे. राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे व शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर हे आहेत. कोणत्या डॉक्टरचा इलाज काम कराणार याची उत्सुकता सर्वांना आहे.


जळगाव जामोद मतदारसंघ
जळगाव जामोदमधील सामना दोन डॉक्टरांमध्येच रंगतदार ठरत आहे. त्यामध्ये भाजपचे डॉ. संजय कुटे व काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांचे शिक्षण बऱ्यापैकी आहे.
मलकापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नितीन नांदुरकर हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. भाजपचे चैनसुख संचेती बीएससी व काँग्रेसचे राजेश एकडे हे बारावी झालेले आहेत.

खामगाव मतदारसंघ
खामगावमध्ये आकाश फुंडकर यांची वकिली आता कितपत काम करते हे महत्त्वाचे ठरत आहे. काँग्रेसचे ज्ञानेश्वर गणेश हे पाचवी, वंचित बहुजन आघाडीचे वसतकर बी. कॉम आहेत.

 

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: 'Race' starts in doctors, professors, lawyers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.