Maharashtra Bandh : संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 05:44 PM2020-01-24T17:44:49+5:302020-01-24T17:44:54+5:30
महाराष्ट्र बंद च्या हाकेला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
संग्रामपूर: महाराष्ट्र बंद च्या हाकेला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सोनाळा, पातुर्डा, वानखेड, वरवट बकाल, संग्रामपूर येथे कळकळीत बंद ठेवण्यात आला. केंद्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली. परिणामी छोटे व मध्यम उद्योग बंद होत आहेत. युवकांना नोकऱ्या रोजगार प्राप्त होत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याने महागाई आभाळाला टेकली. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासन पूर्णपणे फेल ठरले आहे. केंद्र शासनाने संविधान विरोधी भूमिका घेत सुधारित नागरिकत्व कायदा अस्तित्वात आणून घटनाविरोधी धोरण अवलंबल्याने वंचित आघाडीचे सर्वासर्वो प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले. व त्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. वंचित आघाडी कडून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील वरवट बकाल, पातुर्डा, संग्रामपूर, सोनाळा, वानखेड आदी गावांमधील प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाडण्यात आला. तर टुनकी, बावनबीर दोन गावात बंदला प्रतिसाद मिळाला नसून येथील प्रतिष्ठाने सुरूच होती. हे दोन गावे वगळता इतर ठिकाणी या बंदला विविध संघटनांसह व्यापाऱ्यांकडून पाठिंबा मिळाल्याने दि. 24 रोजी बंद शांततेत पार पडले आहे. तत्पूर्वी दि. 23 रोजी वंचित आघाडी कडून केंद्र शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संग्रामपूर तालुक्यात सोशल मीडिया तथा ठिकठिकाणी दवंडी देऊन प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रोजी बंदला प्रतिसाद मिळाले. यावेळी भारीपचे तालुका अध्यक्ष उत्तम उमाळे, ॲड पि. के. घाटे, गोपाल इंगळे, भगतसिंग पवार, अनिल सोनोने, बाळू इंगळे, पि.के. वानखडे, दीपक ससाने, वसूलकार काका, विशाल इंगळे, दयावंत इंगळे, सुभाष इंगळे, गजानन तायडे, राजू तायडे, सुनील वानखडे, मोहन वानखडे, रोशन बेग मिर्जा, जाहेर अली, मुशीर अली, श्रीकृष्ण गावंडे, शेख अफरोज, जुनेद मिर्जा, मौलाना शकील, जहीर भाई, शेख शकील, राज्जाक ठेकेदार, आदींचा सहभाग होता.