मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:24 PM2019-12-30T18:24:55+5:302019-12-30T18:36:41+5:30

पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे.

Maharashtra cabinet expansion: Shiv Sena leaders in western varhada upset | मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद

मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद

Next

- नीलेश जोशी
बुलडाणा: महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या एकाही आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिवसेनेत तीव्र नाराजीसह खदखद व्यक्त होत आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये बसूनच मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी बघत या शपथविधी सोहळ््यावर अघोषित बहिष्कार टाकला. पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान सभेतून डॉ. संजय रायमुलकर किंवा विधान परिषदेतून गोपिकिशन बाजोरिया यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांकडे करण्यात आली होती. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, दोन्ही विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विधान परिषदेचे आ. गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया या बड्यानेत्यांसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शपथविधी कार्यक्रमास जाण्याचे टाळले. माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, बुलडाण्याचे विद्यमान शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, वाशिमचे संतोष मापारी, अमरावती व अकोला येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यासह काही तालुका प्रमुखांचा यामध्ये समावेश आहे. आता यासंदर्भात पश्चिम वºहाडातील नेतेमंडळी नेमकी कोणती भूमिका स्वीकारतात याकडे सध्या राजकीय वतुर्ळाचे लक्ष्य लागून आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार असलेले डॉ. संजय रायमुलकर यांनीही लोकमत शी बोलताना त्यास दुजोरा दिला.
पश्चिम वºहाडात शिवसेनेचे विधानसभेतील तीन आमदार आहेत. यामध्ये डॉ. संजय रायमुलकर (मेहकर), संजय गायकवाड (बुलडाणा) आणि नितीन देशमुख (बाळापूर) यांचा समावेश आहे. दरम्यान, विधान परिषदेतील आ. गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया यांच्यामध्येही नाराजी असल्याचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रीमंडळातील आपले स्थान निश्चित मानणारे डॉ. संजय रायमुलकर यांनी शपथविधी सोहळ््याच्या दृष्टीने संपूर्ण तयारीही केली होती. मात्र एैनवेळी भ्रमनिराश झाल्याने असंतोष व तीव्र नाराजीची धार संघटनात्मक पातळीवर अधिकच वाढली आहे. दरम्यान, पश्चिम वºहाडात बुलडाणा जिल्'ात शिवसेनेची संघटनात्मक पकड मजबूत असून गेल्या तिस वषार्पासून सातत्याने बुलडाणा जिल्'ातून शिवसेनेचे किमान दोन आमदार निवडून येत आहे. पश्चिम वºहाडाचा विचार करता एकट्या बुलडाणा जिल्'ात शिवसेनेची ताकद ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा ३४ दिवसानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येऊन यात २६ कॅबिनेट व १० राज्यमंत्र्यांना ३० डिसेंबर रोजी शपथ देण्यात आली. मात्र यात नेमक्या पश्चिम विदभार्लाच स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही नाराजी आता अधिक तीव्र स्वरुपात समोर येत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ तर सलग सहा टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात असून प्रत्येक वेळी येथे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि त्यानंतर डॉ. संजय रायमुलकर यांनी विक्रमी मताधिक्यासह विजय मिळविलेला आहे. तर खासदार प्रतापराव जाधव यांनी सुमारे ५० वषार्पूर्वीच्या काँग्रेसचे खा. श्रीराम राणे यांच्या सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रमचीही बरोबरी साधली आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडात बुलडाणा जिल्'ात शिवसेनेची मोठी ताकद पाहता आ. डॉ. रायमुलकर यांचा समावेश होणे संघटनात्मक पातळीवर क्रमप्राप्त वाटत होते.

दोन्ही खासदार बैठकीत?

पश्चिम वºहाडातील एकाही आमदाराला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर खा. भावना गवळीही नाराज असल्याचे सांगण्यात येत असून त्यासंदर्भात त्यांना संपर्क साधला असता आपण जिल्हा परिषद निवडणुकीसंदभार्तील एका बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या आमदारांसह पदाधिकाºयांमध्येही तीव्र नाराजी असल्याची भावना आता कार्यकतेर्ही व्यक्त करीत आहेत. बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव यांनीही या मुद्द्यावर स्पष्टपणे न बोलता आपण बैठकीत असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही खासदारांमध्येही मंत्रीमंडळात पश्चिम वºहाडातील एकाही आमदाराला स्थान न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

पश्चिम वºहाडाला मंत्रीमंडळ विस्तरामध्ये वगळल्याच्या पार्श्वभूमीवर खा. प्रतापराव जाधव, आमदार द्वय डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत पश्चिम वºहाडातील जिल्हा शिवसेना प्रमुख व अन्य पदाधिकारी हे लवकरच मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या तीव्र नाराजीच्या भावना कळवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे पश्चिम वºहाडातून विधान सभा किंवा विधान परिषदेतून किमान एकाला संधी द्यावी, अशी मागणीही या लोकप्रतिनिधींनी शिवसेनेचे अनिल देसाई, संजय परब, खा. संजय राऊत यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीला फारसे स्थान देण्यात आले नव्हते.

 

Web Title: Maharashtra cabinet expansion: Shiv Sena leaders in western varhada upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.