Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 03:18 PM2019-10-05T15:18:02+5:302019-10-05T15:18:22+5:30

सातही विधानसभा मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Maharashtra Election 2019: 77 candidates file 115 application in Buldana | Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल

Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६६ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत सातही विधानसभा मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांनी ११ अर्ज, बुलडाणा येथून चार उमेदवारांनी १२ अर्ज, चिखली येथून दहा उमेदवारांनी १५ अर्ज, सिंदखेड राजा येथे १७ उमेदवारांनी २२ अर्ज, मेहकर मतदारसंघासाठी आठ उमेदवारांनी ९ अर्ज, खामगावमधून १४ उमेदवारांनी १४ अर्ज आणि जळगाव जामोद येथे १० उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले आहेत.


चिखलीतून १५ जणांचे अर्ज
चिखली विधानसभा मतदारसंघातून १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये प्रशांत अविनाश डोंगरदिवे यांनी बसपाकडून दोन अर्ज, श्वेता महाले यांनी भाजपकडून चार अर्ज दाखल केले आहेत. अब्दुल सलीम अब्दुल नूर मोहम्मद मेमन यांनी अपक्ष म्हणून, अशोक शिवसिंग सुरडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, परवीन सय्यद हारून यांनी बसपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राजेंद्र विश्वनाथ जवंजाळ यांनी अपक्ष म्हणून, शेख राजू शेख बुढन यांनी अपक्ष म्हणून, निसार अब्दुल कादर शेख यांनी अपक्ष व एआयएमआयएम पक्षाकडून आणि देवानंद पांडुरंग गवई यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.


मेहकरमध्ये नऊ उमेदवार
मेहकर मतदारसंघात अनंता सखाराम वानखडे यांनी काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल केला. तर संजय रायमुलकर यांनी शिवसेनेकडून, लक्ष्मण कृष्णाजी मानवतकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर विशाल अशोक वाकोडे यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून, अनिल देवराव खडसे यांनी बसपा, आबाराव श्रीराम वाघ यांनी वंचित बहुजन आघाडी, समाधान देवराव साठे यांनी अपक्ष, ओम श्रीराम भालेराव यांनी अपक्ष आणि रेखा प्रतापसिंग बिबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


बुलडाण्यात आठ उमेदवारांचे अर्ज
जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड यांनी शिवसेना पक्षाकडून चार अर्ज दाखल केले. मोहम्मद सज्जाद अब्दुल खालीक यांनी एआयएमआयएम पक्षाकडून २ अर्ज, विजय रामकृष्ण काळे यांनी बसपाकडून, विजय हरीभाऊ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी व मनसे पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. रविंद्र राणू मिसाळ यांनी अपक्ष म्हणून शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोन अर्ज दाखल झाले होते.


मातृतीर्थातून १८ उमेदवार रिंगणात
सिंदखेड राजा मतदारसंघात तारामती बद्रीनाथ जायभाये, प्रविण श्रीराम मोरे, मनोज देवानंद कायंदे, विकास प्रकाश नांदवे, भिमराव महादेव चाटे, संगिता रघुनाथ मुंढे, राजेंद्र उत्तमराव शिंगणे, डॉ. गणेश बाबुराव मांटे, विनोद लक्ष्मण वाघ, भागवत देविदास राठोड, एकनाथ नरेंद्र देशमुख व श्रीकृष्णा उत्तम डोळस यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. सविता शिवाजी मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, समाधान त्र्यंबक जाधव यांनी बसपाकडून दोन अर्ज दाखल केले. सुनील गिनाजी इंगळे यांनी आरपीआय डेमोक्रेटीक, सय्यद मुस्ताकीन सय्यद रहीम यांनी इंडियन युनीयन मुस्लीम लीगकडून, डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चार उमेदवारी अर्ज दाखल केले.
मलकापूर: १६
मलकापूर मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात असून, अपक्ष म्हणून प्रवीण गावंडे, संजय दाभाडे, दत्ता गजानन येनकर, अजय भिडे, अवकाश कैलास बोरसे यांनी अर्ज दाखल केले. भाजपकडून चैनसुख संचेती यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एआयएमआयए पक्षाकडून अ. मजिद कुरेशी अ. कदीर यांनी अर्ज दाखल केला. नीळकंठ श्रीराम वाकोडे यांनी भारतीय जन सम्राट पक्षाकडून, राहुल शंकर खंडेराव यांनी बहुजन समाज पक्षाकडून आणि अनिल पंढरी जवरे यांनी एआयएमआयएम पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खामगाव : १७
खामगाव विधानसभा मतदारसंघात कैलास वसंतराव फाटे यांनी स्वाभिमानी पक्षाकडून, रंजना श्रीकृष्ण गायकवाड अपक्ष, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. गणेश जगन्नाथ चौकसे वंचित बहुजन आघाडीकडून, उद्धव ओंकार आटोळे अपक्ष, दिलीप मनोहर भगत बसपाकडून अर्ज दाखल केला आहे. भिमराव हरीश्चंद्र गवई, अजयतउल्लाखान रहेमतउल्ला खान, आकाश देविदास गवई, शब्बीरखा गुलशेरखा, अन्सारखॉ ईबराईमखा, कैलास चंद्रभान शिरसाट यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आकाश फुंडकर यांनी भाजप व मोहम्मद अजहर मोहम्मद शौकत यांनी टिपू सुलतान पार्टीकडून अर्ज दाखल केला.


जळगाव जामोद : १०
जळगाव जामोद मतदारसंघात डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी भाजपाकडून दोन अर्ज दाखल केले. तसेच अपर्णा संजय कुटे यांनी भाजपकडून, संगीतराव भास्करराव भोंगळ यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केला. डॉ. स्वाती संदीप वाकेकर यांनी काँग्रेस पक्षाकडून चार अर्ज दाखल केले. तर प्रशांत काशीराम डिक्कर, प्रसेनजित किसनराव तायडे यांनी अपक्ष म्हणून, शेख मुस्ताक शेख दस्तगीर यांनी टिपू सुलतान पार्टीकडून अर्ज दाखल केला.

 

Web Title: Maharashtra Election 2019: 77 candidates file 115 application in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.