Maharashtra Election 2019 : शहकाटशहाच्या राजकारणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 04:03 PM2019-10-06T16:03:11+5:302019-10-06T16:04:44+5:30

विरोधकाचा विरोधक हा आपला सहकारी या भूमिकेतून बुलडाणा विधानसभा मतदासंघात सध्या हालचाली उभय बाजूंनी सुरू आहेत.

Maharashtra Election 2019: Beginning of Check-mate politics | Maharashtra Election 2019 : शहकाटशहाच्या राजकारणास प्रारंभ

Maharashtra Election 2019 : शहकाटशहाच्या राजकारणास प्रारंभ

Next

- नीलेश जोशी  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात युतीमधील दोघांनी बंडखोरीचे शस्त्र उगारले असतानाच आघाडीच्या उमेदवारांविरोधात पक्षांतर्गत विरोधक एकत्र येत आहेत.
आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढाणारे उमेदवार आणि त्यांना आव्हान देणारे बंडखोर यांच्यामध्ये शहकाटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे येथीलही राजकारण तापले आहे.
बंडखोरांना शांत करण्यासासाठी गाठीभेटीवर जोर दिल्या जात आहे तर विरोधकांकडूनही त्यावर पाणीफिरविण्याचे कसोशीने प्रयत्न होत आहेत. आघाडीत मोताळतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेस उमेदवारावर नाराज होते. त्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्नही युतीतील बंडोखर करीत आहेत. काँग्रेस पक्षांतर्गतचे विद्यमान आमदारांचे विरोधकही एकत्र येण्याची शक्यता असून युतीतील बंडखोरांना साथ देण्याची साधार शक्यता व्यक्त होत असून राजकीय वर्तुळात तशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे युतीत बंडखोरांचे खंदेसमर्थक असणाऱ्यांनीही शिवसेनेची उमेदवारी जुन्यागावातील संजय गायकवाड यांच्या पारड्यात पडल्यानंतर लगोलग आपल्या निष्ठा बदलल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे बंडखोरांना थांबविण्यासाठी तथा थोपविण्यासाठी युतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्याकडूनही प्रयत्न होत असून भाजप जिल्हाध्यक्षांची तीन आॅक्टोबर रोजीच त्यांनी थेट निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीतील तपशील नेमका काय? हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही बंडखोर माजी आमदार विजयराज शिंदे आणि भाजपचे योगेंद्र गोडे हे निवडणूक रिंगणातील तगडे स्पर्धक आहे. परिणामी त्यांच्या हालचालींवरही बारकारईने युतीसमर्थक लक्ष ठेऊन आहेत. दुसरीकडे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे येथील लढतीही रंगतदार ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
नाही म्हणायला सध्या बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय स्थिती ही काहीशी संक्रमणावस्थेत आहे. सातही विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या निकालानंतर याबाबी स्पष्ट होणार आहेत. पंरतू सध्या तरी विरोधकाचा विरोधक हा आपला सहकारी या भूमिकेतून बुलडाणा विधानसभा मतदासंघात सध्या हालचाली उभय बाजूंनी सुरू आहेत. बंडोबांना शांत करण्यात युतीला कितपत यश मिळते हे मात्र सात आॅक्टोबरलाच स्पष्ट होईल. तोवर मात्र बुलडाण्यात राजकीय हालचालींनी मोठा वेग घेतलेला आहे. दुसरीकडे बंडोबांना शांत करण्यासाठी युतीतूनही प्रयत्न होत आहेत. केंद्रात युती सत्तेत आहे. त्यामुळे प्रसंगी पुढील काळात सत्तेतील वाटाही बंडखोरांना युतीतंर्गत दिल्या जाऊ शकतो, असे सुचक वक्तव्यही जिल्ह्यातील मोठे नेते करीत आहेत. त्यामुळे युतीतंर्गतची बंडखोरी रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याचे संकेतच या माध्यातून मिळत आहेत.

मुक्ताईनगरचे आकर्षण
बुलडाण्यासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणातील उमेदवार, बंडखोर आणि काही अपक्षांसह युतीतील काही उमेदवारांना सध्या व्हाया जळगाव जामोद मुक्ताईनगरचे आकर्षण निर्माण झाल आहे. दोन दिवसापासून निवडणूक रिंगणातील काही उमेदवार हे थेट मुक्ताईनगर गाठत आहे. मुक्ताईनगरच्या अचानक राजकीय नेत्यांच्या चकरा वाढण्यामागे कोणते राजकारण आहे, ही बाब गुलदस्त्यात असली तरी जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून राजकीय आशिर्वाद घेऊन निवडणूकीच्या रिगणात उतरण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Beginning of Check-mate politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.