Maharashtra Election 2019 :  पश्चिम विदर्भात खडसे समर्थकांचा बंडाचा झेंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:13 PM2019-10-04T15:13:10+5:302019-10-04T15:13:17+5:30

संतप्त झालेल्या समर्थकांनी बुलडाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघासह पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघात बंडांचा निर्धार केल्याचे दिसून येते.

Maharashtra Election 2019: Khadse supporters take stance of rebel in West Vidarbha! | Maharashtra Election 2019 :  पश्चिम विदर्भात खडसे समर्थकांचा बंडाचा झेंडा!

Maharashtra Election 2019 :  पश्चिम विदर्भात खडसे समर्थकांचा बंडाचा झेंडा!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ज्येष्ठ नेते आणि बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांची भारतीय जनता पक्षाकडून कोंडी केली जात आहे. भाजपच्या तिसऱ्या-चौथ्या यादीतही खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी बुलडाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघासह पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघात बंडांचा निर्धार केल्याचे दिसून येते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १३९ जणांची दुसरी यादी जाहीर केली. त्यानंतर गुरूवारी पुन्हा तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चौथी यादीही जाहीर झाली. मात्र, यादीत एकनाथराव खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. त्यामुळे आता खडसे यांचा पत्ता भाजपने कट केला का? अशी जोरदार चर्चा सुरु झाली असतानाच, जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे समर्थकांच्या भावनांचा उद्रेक झाला. एका खडसे समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, अनेकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने विद्रोहाची सुप्त लाट दिसून येते.
भाजपच्या या षडयंत्राविरोधात आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दांडग्या जनसंपर्कामुळे एकनाथ खडसे यांची जिल्ह्यातील मतदारसंघात चांगली पकड आहे.


खडसे समर्थक आक्रमक!
राज्यात माजी खडसे यांचे समर्थक कमालिचे आक्रमक झाले आहेत. ‘तुम्ही अपक्ष लढाच’, असा आग्रह समर्थकांनी सुरू केला आहे. त्याचवेळी खामगाव विधानसभा मतदारसंघातून माधव पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्याचवेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून योगेंद्र गोडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. बाळापूर मतदार संघातून अच्यूतराव पाटील रिंगणात असल्याची चर्चा आहे.

कोण आहेत माधव पाटील?
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामी प्रकरणात सर्वाधिक तक्रारी दाखल करण्यात माधव पाटील यांनी महत्वाची भूमिका अदा केली होती. त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

भारतीय जनता पक्षाला जनमाणसांत रूजविण्यासाठी नाथाभाऊंचे योगदान मोठे आहे. त्यांची पक्षाकडून अवहेलना केली जात आहे. नाथाभाऊंच्या समर्थनार्थ माझ्यासह अनेक समर्थकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
- माधव पाटील
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक

Web Title: Maharashtra Election 2019: Khadse supporters take stance of rebel in West Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.