'मातृतिर्थाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार'; मोती तलावाच्या सौंदर्याची राज्यपालांना भुरळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:42 PM2022-02-05T12:42:30+5:302022-02-05T12:42:58+5:30
Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी ४ फेब्रुवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भेट देउन ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली.
सिंदखेडराजा : माँसाहेब जिजाऊ यांच्यासारख्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रखर देशभक्त, राष्ट्रनेता, युगप्रवर्तक बालकाला जन्म दिला. त्या महान मातेला शतशत नमन करून आपण या स्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्यपालांनी ४ फेब्रुवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भेट देउन ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सिंदखेड राजा येथे देश-विदेशातून लोक यावेत, येथील अर्थव्यवस्था सुधारावी, यासाठी आपले प्रयत्न असतील, असे राज्यपालांनी सांगितले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे आपले येथील प्रतिनिधी आहेत. तेही येथील सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतील, असे ते म्हणाले.राज्यपालांचे आगमण झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड. नाजेर काजी, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी डॉ. कृष्णा वेनीकर, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
मोती तलावाच्या सौंदर्याची राज्यपालांना भुरळ!https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/9auv7J7fOK
— Lokmat (@lokmat) February 5, 2022
मोती तलावाच्या सौंदर्याची राज्यपालांना भुरळ!
मंत्री, अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्यपालांनी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव येथे भेट देऊन पाहणी केली. हा तलाव शिवकालीन पाणी व्यवस्थापनाचा उत्तम नमुना असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तलावाच्या सौंदर्यांने त्यांना भुरळ घातली. मोती तलाव येथील पाहणी करून त्यांनी थेट राजे लखोजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील स्वराज्य प्रेरणा माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट दिली.